मुंबई : दहिसर येथील ठाकूर रामनारायण पब्लिक स्कूलमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या आर-पूर्व प्रभागामार्फत विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार मनीषा चौधरी यांच्या हस्ते संपन्न झाले. प्रदर्शनाच्या निमित्ताने “जिज्ञासा” नावाचे ई-मॅगेझिनही प्रकाशित करण्यात आले.
या प्रसंगी ठाकूर रामनारायण पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपाल डॉ. पिंकी त्रिपाठी, पूर्ण प्रज्ञा माध्यमिक विद्यालयाचे प्रिन्सिपाल अरुणकुमार दुबे, सौ. रिंकू भावेश दवे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात इयत्ता दहावीतील विद्यार्थी शुभ भलाला याला “प्रेरणा पुरस्कार” आमदार मनीषा चौधरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विज्ञान-नवोन्मेष, विद्यार्थ्यांच्या प्रतिभा-विकास आणि शैक्षणिक उपक्रमांना प्रोत्साहन देणारे हे प्रदर्शन उत्साहात पार पडले.




