ताज्या बातम्या

मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या. — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

नागपूर(रमेश औताडे) : हिवाळी अधिवेशन आपल्या शहरांमध्ये आहे त्यामुळे मंत्री कधीही भेट देऊ शकतात. त्यासाठी केवळ देखावा म्हणून प्रवासी सुविधा निर्माण करू नका! तर वर्षातील 365 दिवस प्रवाशांना त्यांच्या मूलभूत सुविधा मिळणे हे आपल्या कर्तव्य आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करा.असे निर्देश परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज स्थगित झाल्यानंतर परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी नागपूरातील गणेशपेठ बसस्थानकाला अचानक भेट दिली . यावेळी मंत्री सरनाईक यांनी प्रसाधनगृह, उपहारगृह, चौकशी कक्ष, प्रवासी प्रतीक्षालय, चालक-वाहक विश्रांतीगृह यांसह सर्व महत्त्वाच्या विभागांची तपासणी केली. चालक व वाहकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गरम पाण्याची उपलब्धता आणि इतर सुविधा सुधारल्याबद्दल चालक-वाहकांनी मंत्री महोदयांचे आभार मानले.

तसेच बसची प्रतिक्षा करत असलेल्या NCC कॅडेट विद्यार्थी आणि प्रवाशांशी चर्चा करून त्यांच्या सूचनांचा आढावा घेण्यात आला. महिला प्रवाशांसाठी विशेषतः स्ननदा मातांसाठी असलेल्या हिरकणी कक्षाची तपासणीही करण्यात आली. केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी हिरकणी कक्ष निर्माण करु नका ते अद्यायावत करून तिथे महिला कर्मचारी नियुक्त करा. असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले .

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top