ताज्या बातम्या

कराड तालुका जिल्ह्यात अव्वल; प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) दुसऱ्या टप्प्यात सातारा जिल्ह्यात सर्वप्रथम 1001 घरकुले पूर्ण

कराड(प्रताप भणगे) ; मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत कराड तालुक्याने जिल्ह्यातील पहिले घरकुलही पूर्ण करण्याचा मान मिळवला; या यशाचे श्रेय मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्रकल्प संचालक विश्वास सिद्ध, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी खेडेकर तसेच नरेगा कक्ष, घरकुल कक्ष, सर्व ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक व तालुकास्तरीय टीमच्या अथक परिश्रमांना; लाभार्थ्यांना वेळेत हप्ते, मनरेगा मस्टरचे पैसे, शौचालय अनुदान उपलब्ध करून देणे आणि घरकुल टीमने अडचणी सोडवल्यामुळे विक्रमी यश; सहकारी विस्तार अधिकारी (सांख्यिकी) सागर बोलके, विस्तार अधिकारी करचे, स्वामी, बर्गे, पोतदार, येरवलकर, नरेगा विभागातील रेखा सगरे, पूनम मोरे, सागर जाधव, गणेश कोळी, रोहित करे, महेश जांभळे, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता अक्षय पाटील, विनायक मोरे, संदेश कदम, क्लार्क खापे यांचे उल्लेखनीय योगदान; या कामगिरीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला बळ; गरीब कुटुंबांना पक्के घर मिळवून देण्याच्या दिशेने कराड तालुक्याचे मोठे पाऊल;

कोट — “PMAY-G अंतर्गत लाभार्थ्यांच्या अडचणी ग्रामपंचायत अधिकारी व तालुका घरकुल टीमने सोडवल्यामुळे जिल्ह्यात प्रथम 1001 घरकुले कराड तालुक्यात पूर्ण झाली.” — प्रताप पाटील, गटविकास अधिकारी पंचायत समिती कराड;

फोटो — लाभार्थ्यांना घरकुलाची चावी प्रदान करताना प्रताप पाटील, सागर बोलके व उपस्थित अधिकारी-कर्मचारी.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top