ताज्या बातम्या

राज्याचे नवे महाधिवक्ता म्हणून चिपळूणच्या मिलिंद साठे यांची नियुक्ती

चिपळूण : राज्याच्या महाधिवक्ता पदासाठी चिपळूण तालुक्यातील मालघर गावचे सुपुत्र आणि वरिष्ठ विधीज्ञ मिलिंद साठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी काही महिन्यांपूर्वी राजीनामा दिला होता. मात्र, नव्या नियक्तीपर्यंत जबाबदारी सांभाळण्याची विनंती सरकारने त्यांना केली होती. त्यानुसार ते कार्यभार पाहत होते.

मिलिंद साठे हे मुंबई उच्च न्यायालयातील अनुभवी आणि प्रतिष्ठित वरिष्ठ वकील म्हणून ओळखले जातात. विविध महत्त्वाच्या खटल्यांमध्ये त्यांनी प्रभावीपणे बाजू मांडली असून त्यांचा समृद्ध अनुभव राज्य सरकारला मोठा उपयोग ठरेल, असा विश्वास मंत्रिमंडळातील सदस्यांनी व्यक्त केला आहे.

मालघर–चिपळूण येथील विधीज्ञ राज्याच्या सर्वोच्च कायदे पदावर विराजमान झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यासह चिपळूण तालुक्यात आनंद व्यक्त केला जात आहे. स्थानिक पातळीवर ही नियुक्ती हा मोठा गौरवाचा क्षण मानला जात आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top