कराड(प्रताप भणगे) : कराड तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री. नितीन भिमराव ढापरे यांच्या सत्कार समारंभास खोडशी (ता. कराड) येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास विशेष उपस्थिती दर्शवित कराड तालुक्यातील विविध माध्यमांतील पत्रकारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
या प्रसंगी कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे नव्याने निवडलेले उपसभापती श्री. नितीन ढापरे यांचे मन:पूर्वक अभिनंदन करण्यात आले. पुढील कार्यकाळासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देत त्यांच्या योगदानाला मान्यवरांकडून गौरवाची पारितोषिके मिळाली.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर (दादा) उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी श्री. ढापरे यांच्या कार्यशैलीचे आणि सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल कराड तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचे विशेष कौतुक करण्यात आले.
यावेळी श्री. विकास भोसले, श्री. अभय देशमुख, श्री. प्रमोद तोडकर, श्री. वैभव पाटील, श्री. शरद गाडे, श्री. संभाजी थोरात, श्री. रामभाऊ जगताप, श्री. सतीश मोरे, श्री. देवदास मुळे, श्री. शशिकांत पाटील, श्री. गोरख तावरे, प्रा. अशोक चव्हाण, श्री. प्रमोद सुकरे, श्री. दिलीप माने, श्री. सचिन शिंदे, श्री. विजय पाटील, श्री. दिनकर थोरात, श्री. सुरेश डुबल तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, संपादक आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारंभात आनंदी वातावरण, मान्यवरांचे मनोगत आणि पत्रकार बांधवांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम संस्मरणीय ठरला.




