सायगाव(अजित जगताप) : जावळी तालुक्यातील बाजारपेठेचे गाव असलेल्या सायगाव येथील लघुउद्योजक किरण तथा हिंदुराव कदम यांचे चिरंजीव पृथ्वीराज हिंदूराव कदम याची एअर फोर्स मध्ये फ्लाईंग ऑफिसर क्लास वन पदी निवड झाली आहे .त्याने मिळवलेल्या या यशाचा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या इतरांनी आदर्श घ्यावा व उंच भरारी मारावी अशी अपेक्षा सातारा जिल्ह्यातील शिक्षक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र मुळीकगुरुजी यांनी केले.
सायगाव विभागातील प्राथमिक शिक्षकांच्या वतीने पृथ्वीराज कदम यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. सायगाव सारख्या ग्रामीण भागातील बाजारपेठ असलेल्या गावात राहून एअर फोर्स विभागाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. उत्तुंग यश मिळवले आहे . पृथ्वीराज कदम फ्लाईंग ऑफिसर बनवण्यासाठी प्रशिक्षणाला सुद्धा जाणार आहेत. त्यांची निवड ही त्यांनी केलेल्या जिद्द, परिश्रम व अभ्यासाचे प्रतीक आहे. सायगाव विभागासाठी गौरवास्पद बाब आहे. या निवडीमुळे या विभागामध्ये आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करणार असल्याची ग्वाही श्री मुळीक गुरुजी यांनी देऊन दिली आहे.पृथ्वीराज कदम यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी शिक्षण क्षेत्रातील केंद्रप्रमुख संभाजी भोसले, मिलिंद जगताप, धैर्यशील भोसले,रोहिदास भोसले, विनायक चोरट, लक्ष्मण कदम, ज्ञानेश्वर आगुंडे, राहुल देशमाने, सुनील राजमाने यांच्यासह आजी माजी शिक्षक, सायगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान ,श्री. मच्छिंद्र मुळीक गुरुजी यांनी शिक्षण क्षेत्रासोबतच उद्योग व्यवसायातही मोठी झेप घेतलेली आहे. सायगाव भागातील होतकरू तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केल्यामुळे ग्रामस्थांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत.
—– —– —— —– —- —– —- — —
फोटो– सायगाव भागातील श्री पृथ्वीराज हिंदुराव कदम यांची फ्लाईंग ऑफिसर पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना गुरुजन (छाया– निनाद अजित जगताप, सायगाव)
—- —– —– —- —– —– —– —– —




