ताज्या बातम्या

वरिष्ठ पत्रकार नितीन ढापरे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड; कराड तालुका पत्रकारितेच्यावतीने सत्कार समारंभाचे आयोजन

कराड(प्रताप भणगे) : कराड तालुक्यातील कापिल गावचे सुपुत्र आणि वरिष्ठ पत्रकार नितीन भिमराव ढापरे यांची कराड तालुका शेती उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदासाठी बिनविरोध निवड झाल्याबद्दल कराड तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम उद्या रविवार, ७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता हॉटेल शिवनेरी, खोडशी (ता. कराड) येथे होणार आहे.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ऍड. उदयसिंह पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते सारंगबाबा पाटील उपस्थित राहणार आहेत.

नितीन ढापरे यांनी गेली २५ वर्षे कराड शहर व तालुक्यात अत्यंत प्रामाणिक व निष्ठेने पत्रकारितेची सेवा केली असून सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. तीन वर्षांपूर्वी कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांच्या निवडीवर मुहर लागल्यानंतर आता त्यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड होऊन त्यांच्या कार्याला आणखी प्रेरणा मिळाली आहे.

सत्कार समारंभामुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण असून पत्रकार बांधवांतही उत्साहाचे संचार झाला आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top