मसूर(प्रताप भणगे ) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मसूर ग्रामपंचायतीत त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. आज आयोजित या कार्यक्रमास मसूरचे सुपुत्र व शास्त्रज्ञ पद्मभूषण ज्येष्ठराज जोशी व त्यांच्या सौ. उपस्थित होते.
यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ–क्रीडा समितीचे माजी सभापती मा. मानसिंगराव जगदाळे साहेब, मोरेश्वर जोशी, नाथाजी जगदाळे, बापूसाहेब जगदाळे, शेखर जगदाळे, सिकंदर शेख, संजय जगदाळे, जितेंद्र निकम, विकास पाटोळे, शंकरराव भोसले, दिलावर मुल्ला, भीमराव कांबळे, अशोक सोनार, धिरज जगदाळे, रोहित कदम, भूषण पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.
महामानवाच्या स्मृती दिनी ग्रामपंचायतीत एकत्र येऊन आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या उपस्थितीत समाजबंधुंनी आंबेडकरांनी दिलेल्या सामाजिक समतेच्या आणि ज्ञानाच्या मूल्यांना पुन्हा उजाळा दिला.




