ताज्या बातम्या

भारतभ्रमणावर निघालेल्या दोन महिला शनिवारी ठाण्यात

प्रतिनिधी : नागपूर येथील दोन महिला- डॉ. अंशुजा किम्मतकर (डॉक्टर, लेखिका, लिम्का रेकॉर्ड धारक) आणि श्रीमती लक्ष्मी माथरे (उद्योजिका आणि सामाजिक कार्यकर्त्या) या भारताचे रंग- नारीच्या संग या मिशन अंतर्गत कारने संपूर्ण भारताच्या परिक्रमेसाठी निघाल्या आहेत.
१ ऑक्टोबर रोजी झिरो माईलहून निघालेल्या या दोन धाडसी महिला संपूर्ण भारताची २४ हजार किमीची परिक्रमा करणार आहेत. महिला सक्षमीकरण, साहस आणि भारतातील विविधतेचा सन्मान या तीन उद्देशांसह त्यांनी ही परिक्रमा सुरू केली आहे.
आजवर त्यांनी गुजरात व राजस्थान वगळता सर्व राज्यांची सफर केली आहे. या दोन महिलांनी शुक्रवारी रत्नागिरीहून प्रवास सुरू करीत रात्री ठाणे गाठले.
उद्या शनिवारी ६ डिसेंबर रोजी ठाण्यात मुक्काम करून त्या रविवारी गुजरातला निघणार आहेत.
त्या शनिवारी ६ डिसेंबर रोजी ठाण्यातील शासकीय विश्रामगृह, कोर्ट नाका, ठाणे येथे दिवसभर थांबणार असून आजवरचे त्यांचे प्रवासातील अनुभव, त्यांच्या भारत परिक्रमेचा हेतू व इतर बाबींविषयी आपण संवाद साधून त्यांच्या या धाडसाचे व संकल्पनेचे कौतूक करावे, ही नम्र विनंती

संपर्क-
१) डॉ. अंशुजा किम्मतकर- ९२७०३७८७७३ आणि ९८३४१६८४१९

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top