ताज्या बातम्या
“शिवसेना–भाजप युती ही विचारधारेची युती, ही युती कायम राहणार” ; रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे इगतपुरी मध्ये स्पष्टीकरणमहात्मा जोतीराव फुले : समानतेच्या संघर्षाचा तेजोदीपजी.के.एस. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी राज्यस्तरीय बॉक्स लंगडी स्पर्धेत पटकावला तृतीय क्रमांकएमपीडीए कारवाई रद्द न झाल्याने सामाजिक कार्यकर्त्यांना खुनाच्या धमक्या; खेड पोलिसांत गुन्हा दाखल“राज्याची तिजोरी जनतेचीच – शेतकरी, कष्टकरी आणि बहिणींसाठीच खर्च होणार.” ; लाडकी बहिण योजनेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सडेतोड प्रत्युत्तर

जी.के.एस. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी राज्यस्तरीय बॉक्स लंगडी स्पर्धेत पटकावला तृतीय क्रमांक

मुंबई (शांताराम गुडेकर) : बॉक्स लंगडी असोसिएशन ऑफ रायगड आयोजित बॉक्स लंगडी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र 4th बॉक्स लंगडी राज्य स्तरीय चॅम्पियनशिप -२०२५ चे आयोजन केले होते.या स्पर्धांचे आयोजक श्री.मारुती हजारे सर यांनी उत्तम रीतीने स्पर्धा आयोजन केले.या स्पर्धा एम.एन.आर.स्कूल ऑफ एक्सेल कामोठे येथे पार पडल्या.
या स्पर्धेत मैत्रेय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित जी.के.एस.कॉलेज कला,वाणिज्य व विज्ञान, महाविद्यालय खडवलीतील विद्यार्थी कु.रोहित ठाकरे, कु.कौस्तुभ शेवाळे,कु.प्रणव डहाळे,कु.सुजल फुलमाळी,कु.दर्शन किसले,कु. देवांश तिवारी,कु. पारस चेखलिया,कु. रोहित कविथिया, कु.जिशान शेख, कु. ईशांत घोडके यांनी १९ वर्ष वयोगट खालील गटात भाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी करून तृतीय क्रमांक पटकाविल्यानंतर पनवेल येथे होणाऱ्या राष्ट्रीय बॉक्स लंगडी स्पर्धात निवड झाली आहे.
महाविद्यालयच्या संचालिका सौ.कविता शिकतोडे मॅडम तसेच प्राचार्य डॉ.एस.जी.सागर सर उपप्राचार्य श्री.प्रशांत तांदळे सर तसेच महाविद्यालय चे क्रीडा शिक्षक सौ.हर्षला विशे मॅडम व श्री.बाळाराम चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्याचा सत्कार केला.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top