ताज्या बातम्या
“शिवसेना–भाजप युती ही विचारधारेची युती, ही युती कायम राहणार” ; रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे इगतपुरी मध्ये स्पष्टीकरणमहात्मा जोतीराव फुले : समानतेच्या संघर्षाचा तेजोदीपजी.के.एस. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी राज्यस्तरीय बॉक्स लंगडी स्पर्धेत पटकावला तृतीय क्रमांकएमपीडीए कारवाई रद्द न झाल्याने सामाजिक कार्यकर्त्यांना खुनाच्या धमक्या; खेड पोलिसांत गुन्हा दाखल“राज्याची तिजोरी जनतेचीच – शेतकरी, कष्टकरी आणि बहिणींसाठीच खर्च होणार.” ; लाडकी बहिण योजनेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सडेतोड प्रत्युत्तर

एमपीडीए कारवाई रद्द न झाल्याने सामाजिक कार्यकर्त्यांना खुनाच्या धमक्या; खेड पोलिसांत गुन्हा दाखल

मुंबई(रमेश औताडे) : राज्यस्तरावर सामाजिक कार्य करणारे अशोकराव टाव्हरे यांना खुनाच्या धमक्या दिल्याप्रकरणी खेड पोलिसांनी अनिकेत नाणेकर, जगदीश नाणेकर तसेच अक्षय गायकवाड, कुमार गायकवाड यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंदवला असून प्रतिबंधात्मक कारवाईची तयारी सुरू आहे.

टाव्हरे यांच्याकडे आरोपी अक्षय गायकवाड याने संकेत उर्फ माँटी नाणेकर याच्यावरील एमपीडीए कारवाई शासन स्तरावर रद्द होऊ शकते का, अशी विचारणा केली होती. टाव्हरे यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून आवश्यक कागदपत्रे मिळवून सहकार्यही केले. मात्र गृह विभागाने संकेत नाणेकर यांच्यावर खुन, खुनाचा प्रयत्न, कट, खंडणी यांसारखे गंभीर गुन्हे असल्याने आणि फिर्यादीवर दहशत निर्माण करून घेतलेला समझोता मुंबई उच्च न्यायालयाने अमान्य ठरवल्याने एमपीडीए कारवाई कायम ठेवली.

कारवाई रद्द न झाल्यामुळे अनिकेत नाणेकर, त्याचे वडील जगदीश नाणेकर, संकेत नाणेकर व गायकवाड बंधूंनी प्रत्यक्ष भेटून टाव्हरे यांना “एमपीडीए रद्द करा, अन्यथा संपवून टाकू” अशी धमकी दिल्याचे टाव्हरे यांनी पोलिसांना सांगितले.

अक्षय गायकवाड हा सोशल मिडियावर संकेत नाणेकरसोबतचे कारागृहातील फोटो व्हायरल करून दहशत निर्माण करत असल्याचे समोर आले आहे. नाणेकर टोळी चाकण, म्हाळुंगे व राजगुरुनगर परिसरात खंडणी आणि हप्तेवसुली करत असल्याची नागरिकांची तक्रार असून अनेकजण भीतीमुळे पुढे येत नाहीत. अशोकराव टाव्हरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तातडीने कारवाईचे आदेश देण्याची मागणी केली आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top