ताज्या बातम्या

दादर सुंदरनगरमध्ये दत्तजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई(भीमराव धुळप) : दादर (प.) येथील सुंदर नगर, सेनापती बापट मार्गावर साईकृपा मित्र मंडळ यांच्या वतीने यावर्षी ४० वा सार्वजनिक दत्तजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. उत्सव निमित्त मंडळाने धार्मिक व सामाजिक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

२ डिसेंबर २०२५, मंगळवार रोजी सायंकाळी ६.३० वाजता साईबाबा व दत्त पालखीची भव्य मिरवणूक होणार आहे. दिंडी, टाळ-चिपळ्या व हरिनामाच्या गजरात परिसर भक्तिमय होणार आहे.

३ डिसेंबर, बुधवार रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत भव्य आरोग्य शिबीर होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ६.३० ते १० या वेळेत सांस्कृतिक भजनाचा कार्यक्रम होणार आहे.

४ डिसेंबर २०२५, गुरुवार रोजी सकाळी १० वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा होणार आहे. तसेच दुपारी १२ ते रात्री ११ या वेळेत भाविकांसाठी साईंचा भंडारा (महाप्रसाद) ठेवण्यात आला आहे.

भाविकांनी सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top