
मुंबई (शांताराम गुडेकर) : २९ ऑगस्ट १९४७ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली.अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला.त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो.सालाबादप्रमाणे याही वर्षी जी.के.एस. महाविद्यालयात संचालिका सौ.कविता शिकतोडे मॅडम याच्या मार्गदर्शनाखाली संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.जी सागर सर,उपप्राचार्य प्रा.प्रशांत तांदळे सर तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.तसेच वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठया प्रमाणात उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्रा.रसिका लोकरे मॅडम यांनी केले.कार्यक्रमाची सुरुवात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांकडून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून घेण्यात आले.तसेच डॉ.एस.जी. सागर यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्व समजून सांगितले व मार्गदर्शन केले.




