सातारा(अजित जगताप)

: सामाजिक कार्यासाठी नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिवाजीताई प्रीतम कळसकर यांना बॅट हे चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे सातारा नगरपालिका पाच प्रभागांमध्ये त्यांच्याच बॅटची सुप्त लाट आहे. ते नक्कीच विकासाचे नेट तयार करतील. असा विश्वास या प्रभागातील निर्व्यसनी मतदार व तरुण वर्गाला वाटत आहे.
निवडणुका म्हटलं की, राजकारणाच्या मैदानात आरोप प्रत्यारोपाचे गुगली व यॉर्कर, बाऊन्सर पडत असतात. त्यावेळी डगमगून न जाता आपल्या नैसर्गिक व शास्त्रशुद्ध पद्धतीने क्रिकेट खेळाडू बॅटने चेंडू खेळणाऱ्या खेळाडूंना शतक गाठता येते. अशाच पद्धतीने आत्मविश्वास व जिद्द, चिकाटी आणि सामाजिक कार्याची जोड असल्यामुळे प्रभाग पाच मजूर निवडणुकीच्या मैदानातील अपक्ष उमेदवार सौ. शिवानीताई प्रीतम कळसकर यांना मतदार संघातून उदंड प्रतिसाद लाभला आहे. त्यांच्या कार्याची ओळख संपूर्ण सातारा शहराला असल्याने एक चांगली कर्तबगार नगरसेविका मतदार संघात होणार आहे. असा आशीर्वाद दिला जात आहे.
सर्वसामान्यांना सातारकरांना केंद्रबिंदू मानून त्यांनी यापूर्वीच आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या खंबीर पाठीशी असलेले उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते प्रीतम कळसकर यांच्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातील व सातारा शहराला परिचित असलेल्या जोडीदाराची साथ लाभलेली आहे.
अनेक महिला या पतीच्या कार्यावर अवलंबून असतात. परंतु, याला सौ .शिवानीताई कळसकर या अपवाद आहेत.
सातारा शहरातील प्रभाग पाच क्रमांक हा खऱ्या अर्थाने सुशिक्षित व कोणत्याही भूलथापाला बळी न पडता कार्यरत राहणारा मतदारसंघ आहे. या मतदारसंघांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम व परंपरा जपण्याचे काम त्यांनी यापूर्वीच केलेले आहे. आणि पुढे करत राहणार आहे. याची मतदारांनाही खात्री पटली आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत व जागृत देवस्थान आई भवानी मातेचा आशीर्वाद व मतदार माता भगिनींना त्यांना आपलेसे केल्यामुळे त्यांच्या विजयाचे अंतर कमी झाले आहे. आणि त्यांनी संयमी व निर्भीडपणे आश्वासनाच्या बॅटने मारलेला चेंडू हा विजयाच्या सीमारेषेपर्यंत पोहोचलेला आहे. महिला-तरुण वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक अशा तिन्ही वर्गाचा त्यांना पाठिंबा मिळत आहे . लोकसेवा आमचा धर्म या तत्त्वावर आधारित त्यांनी निष्ठा हीच आमची ओळख अशा छबी निर्माण केलेली आहे. निष्ठेला सुद्धा त्यांनी सलाम केलेला आहे. त्यांच्या उच्च विद्याविभूषित व सामाजिक कार्यामुळे या निवडणुकीमध्ये महिला सक्षमीकरण, ज्येष्ठ व्यक्ती यांच्यासाठी आदर व सुविधा, शालेय विद्यार्थी यांच्यासाठी ग्रंथालय, संगणक शिक्षण व शैक्षणिक साहित्य वाटप यासाठी त्या सढळ हस्ते सहकार्य करणार आहेत. त्यांच्या बॅटच्या फटकाऱ्याने अनेक नशापान करण्यास प्रवृत्त करणाऱ्या बाटल्या उध्वस्त होणार आहेत. अशी विनोदाने चर्चा केली जात आहे.
तरुणांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे . दुसऱ्या बाजूला विकास कामांचा निधी आणून सुद्धा निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे अनेकदा अपघात होत आहेत. एका बाजूला व्यसनाचे संकट तर दुसऱ्या बाजूला निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे अपघात होत आहेत.अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या मतदारांनी या दोन गोष्टी हद्दपार करण्यासाठी मतदारसंघात सौ. कळसकर व दुसरे अपक्ष उमेदवार राम हादगे यांचे चिन्ह आज खऱ्या अर्थाने तळपत आहे. त्यांच्या बॅटचा धसका घेऊन अनेकांनी आता अपप्रचार सुरू केला असला तरी आई भवानी माता व अनेक माता-भगिनींनी त्यांना आशीर्वाद आहेत याची प्रचार निमित्त त्यांना खात्री पटली आहे आता गुलालाची औपचारिकता बाकी आहे. सातारा शहरातील प्रभाग पाच मध्ये परिवर्तनाची लाट आहे. त्यांच्या प्रचार यंत्रणे कडून आचारसंहितेचे काटेकोरपणाने पालन होत आहे . प्रभाग क्रमांक पाच मधील सुज्ञ मतदारांनीही निर्भीडपणाने मतदान केंद्रापर्यंत जाऊन मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे. मतदान हे श्रेष्ठदान असून आपल्या मतदानातूनच प्रभाग क्रमांक पाच मधील विकास होणार आहे. हे सांगण्यासाठी सुद्धा सौ .शिवानीताई कळसकर आघाडीवर आहेत. सर्वांनीच आपल्या मताप्रमाणेच मतदान करावे. कोणत्याही अवैद्य मार्गाने मिळवणाऱ्या आमिषाला बळी पडू नये. असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.




