ताज्या बातम्या

प्रेमिलाताई चव्हाण कन्या शाळा, मलकापूर – मेडिटेशन व स्ट्रेस मॅनेजमेंट कॅम्प

कराड(विजया माने) : प्रेमिलाताई चव्हाण कन्या शाळा, मलकापूर येथे रोटरी क्लब मलकापूर तर्फे नववी व दहावीच्या विद्यार्थिनींसाठी मेडिटेशन आणि स्ट्रेस मॅनेजमेंट या तीन दिवसीय कॅम्पचे आयोजन करण्यात आले. आज या कॅम्पचे प्रथम सत्र यशस्वीरीत्या पार पडले.
या सत्राचे मार्गदर्शन शोभा पाटील आणि जाधव मॅडम यांनी अतिशय प्रभावीपणे केले. विद्यार्थिनींना तणाव व्यवस्थापन, श्वसन तंत्र, मन:शांती आणि आत्मविश्वास वाढविण्याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले.
कार्यक्रमास खालील मान्यवरांची उपस्थिती लाभली :
अध्यक्ष : राहुल जामदार, रो. सलीम मुजावर, प्रोजेक्ट चेअरमन रो. विलासराव पवार, रो. राजन वेळापुरे, रो. आनंदराव बागल, रो. विजया माने, तसेच रोटरी क्लबचे इतर मान्यवर सभासद कार्यक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन आणि विद्यार्थिनींनी समाधान व्यक्त केले असून पुढील दोन दिवसांतही विविध उपयुक्त सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top