ताज्या बातम्या

परिवहन आयुक्तांनी केले पर्यावरणपूरक दुचाकीचे उद्घाटन

मुंबई(रमेश औताडे) : इलेक्ट्रिक दुचाकी बनवणारी अल्ट्रावॉयलेट कंपनीने अंधेरी, वाशी आणि ठाणे येथे तीन नवीन यू व्ही स्पेस स्टेशन्स सुरू केले आहेत. हॉलमार्क मोबिलिटी एलएलपीच्या भागीदारीत सुरू झालेल्या या केंद्रांत एक्स ४७ क्रॉसओव्हर, एफ ७७ सुपरस्ट्रीट आणि एफ ७७ मॅक २ ही मॉडेल्स उपलब्ध आहेत. विक्री, सेवा, सुटे भाग आणि टेस्ट राईड सुविधा एका ठिकाणी मिळणार आहेत.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण सुब्रमण्यम यांनी मुंबईतील विस्ताराला “महत्त्वाचा टप्पा” म्हटले आहे. हॉलमार्क मोबिलिटीचे जिग्नेश मेहता यांनीही या भागीदारीला उत्साहाने प्रतिसाद दिला. या दुचाक्यांमध्ये शक्तिशाली पॉवरट्रेन, दीर्घ रेंज, ट्रॅक्शन कंट्रोल, पुनर्निर्मित ब्रेकिंग आणि एक्स–सत्तेचाळीस मध्ये अत्याधुनिक यूव्ही रडार इंटेलिजन्स अशी आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top