ठाणे – येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज, दि.२६ नोव्हेंबर, २०२५ रोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील समिती सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.
यानिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने यांनी संविधान दिनाचे महत्त्व, भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये आणि लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाची भूमिका याबाबत मार्गदर्शन करून संविधानातील मूल्ये आचरणात आणण्याविषयी त्याचबरोबर आपापल्या कार्यक्षेत्रात पारदर्शकता व जबाबदारी बाळगण्याचे आवाहन केले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रूपाली भालके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शशिकांत गायकवाड, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) वरूणकुमार सहारे, जिल्हा खनिकर्म अधिकारी विवेक घुले, तहसिलदार सचिन चौधर, संदीप भोसले, अमोल कदम, नायब तहसिलदार किशोर जाधव, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.




