ताज्या बातम्या

भारताच्या मुख्य न्यायाधीशांना अन्यायग्रस्त जनतेची सलामी

मुंबई(रमेश औताडे) : भारताचे ५३ वे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी जो अन्यायग्रस्त जनतेला न्याय दिला त्याबद्दल सर्व अन्यायग्रत जनतेकडून त्यांचे मी अभिनंदन करतो. त्यांचे अभिनंदन म्हणजे अन्यायग्रस्त जनतेला एक सत्याची सलामी आहे. असे मत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कनेरसर गावचे कवी लेखक पत्रकार समाजसेवक अशोकराव टाव्हरे यांनी आजच्या शपथविधी सोहळ्या दरम्यान व्यक्त केले.

एका याचिके संदर्भात न्यायमूर्ती सुर्यकांत यांचे कामकाज अनुभवण्याची मला संधी लाभली होती. एप्रिल २०२२ मध्ये फक्त १५ लाखांची उलाढाल असलेल्या यमाई पतसंस्था प्रकरणी पंधरा वर्षानंतर सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांच्या खेड पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता. तपासात १४ लाख ४२ हजारांची ठेवी यादी, कर्ज दिल्याचे निष्पन्न व कर्ज थकबाकीमुळे पतसंस्था बंद पडल्याचे निष्पन्न झाले होते.

राजकीय हेतुने तपास खेड ऐवजी मंचर पोलीस स्टेशनला दिला होता. करोडोंच्या ठेवीचा खोटा आरोप व तपासात दबाव हे मुद्दे मांडल्याने सत्र व उच्च न्यायालयात टाव्हरे यांना अटकपूर्व जामीन मिळाला नाही. टाव्हरे यांनी ॲड सौम्य दत्ता व ॲड विराज कदम यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, तेव्हा न्यायमूर्ती सूर्यकांत व न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठाने टाव्हरे याना ९ नोव्हेंबर २०२२ रोजी अंतरिम जामीन दिला.

२ जानेवारी २०२३ रोजी अंतिम सुनावणी न्यायमूर्ती सूर्यकांत व न्यायमुर्ती माहेश्वरी यांच्या खंडपीठाने १५ वर्षानंतर दाखल केलेला गुन्हा हा संस्था असुनही एकट्यावर गुन्हा दाखल होणे या बाबी राजकीय हेतु स्पष्ट करीत असल्याचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी युक्तीवादावेळी सरकारी अभियोक्ता यांना सुनावले होते.

मुंबई उच्च न्यायालयाने खेड पोलीस स्टेशनचे तपासाधिकारी यांना ८ जुलै २०२४ रोजी संस्थेवर अवसायक नेमल्यानंतर दहा वर्षांनी गुन्हा कसा दाखल केला याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगूनही दाखल न केल्याने माननीय उच्च न्यायालयाने १७ नोव्हेंबर रोजी आरोपपत्र दाखल करण्यास पुढील सुनावणीपर्यंत मनाई केली आहे.

भारताचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणारे न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा माझ्या याचिकेतील दोन्ही सुनावण्यांमध्ये आदेश देण्यात मोलाचा वाटा होता, त्यांच्या निर्णयाने सत्य सामोरे आले व उच्च न्यायालयात पोलीस प्रतिज्ञापत्र १६ महिने दाखल करू शकले नाही. साडे तीन वर्षे आरोपपत्र दाखल केले नाही ही बाब निश्चितच राजकीय हेतुने प्रेरित होऊन केल्याचे स्पष्ट करते असे अशोकराव टाव्हरे यांनी सांगितले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top