ताज्या बातम्या

स्पंदन जीवन गौरव पुरस्काराची रक्कम पुरग्रस्त विद्यार्थ्याला

तळमावले/वार्ताहर : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने स्पंदन जीवन गौरव पुरस्काराची रु.5,000 ही रक्कम लातूर जिल्हयातील अवधूत देवानंद माळी या पुरग्रस्त बाधित विद्यार्थ्याला ऑनलाईन पध्दतीने पाठवली आहे. झी 24 तास या वृत्तवाहिनीवर 7 ऑक्टोंबर, 2025 रोजी लातूर जिल्हयातील एकुरगा या छोटयाशा गावातील अवधूत माळी याची कहाणी मांडली होती. यातून त्याला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत स्पंदनने खारीचा वाटा उचलला आहे.
महाराष्ट्र शासन, मान्यताप्राप्त सहाय्य धर्मादाय आयुक्त संलग्न व आयएसओ मानांकनप्राप्त पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने कला, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, वैद्यकीय, उद्योग, कृषी व क्रीडा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना प्रतिवर्षी स्पंदन जीवन गौरव देवून गौरवण्यात येते. या पुरस्कारांचे स्वरुप रोख रक्कम रु.5,000/-, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि पुस्तक आहे.
यापूर्वी नीलकंठ खाडीलकर (पत्रकारिता), पद्मश्री डाॅ.विजय शहा (वैद्यकीय), खा.श्रीनिवास पाटील (राजकीय), ॲड.जनार्दन बोत्रे (सहकार), प्राचार्य डाॅ.यशवंत पाटणे (साहित्य), श्री गुरु श.ब्र.प्र.108 डाॅ.नीलकंठ धारेश्वर महाराज (अध्यात्मिक) यांना देण्यात आला आहे.
यंदाच्या पुराच्या पार्श्वभूमीवर सन 2025 चा स्पंदन जीवन गौरव पुरस्कार जाहीर न करता त्याची रक्कम पुरग्रस्तांना देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार पुरस्काराची रु.5,000 ही रक्कम अवधूत देवानंद माळी या विद्यार्थ्याला पाठवली आहे.
झी 24 तासचे संपादक कमलेश सावंत आणि त्यांची टीम यांच्या संकल्पनेतून ‘फक्त लढ म्हणा’ हे विशेष सामाजिक अभियान राबवले गेले होते. या मोहिमेतून पूरग्रस्त आणि गरजू शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी आर्थिक मदत देण्यात येत आहे.
यापूर्वी डाकवे परिवाराने शैक्षणिक चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोषिक, ज्ञानाची शिदोरी, माणुसकीच्या वहया, एक वही एक पेन, गणवेश वाटप, शाळेला तक्ते वितरण, विनामुल्य बोलक्या भिंती, महापुरुषांच्या प्रतिमांचे वितरण, गुणवंत विद्यार्थ्यांचा घरी जावून सत्कार, स्वाध्यायमाला वितरण, दिव्यांग मुलांना चित्रकला साहित्य वाटप, बेटी बचाओ बेटी पढाओ’ चा संदेश देत महिलांना प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप, कॅलिग्राफीतून अक्षरसंस्कार, पुस्तकांचे झाड इ.उपक्रम राबवले आहेत.
तसेच सॅल्युट कार्ड, सेल्फी विथ गुढी, निबंध, चित्रकला, किल्ले बनवा इ. स्पर्धा राबवल्या आहेत.
सामाजिक जबाबदारीचे भान ओळखत डाॅ.संदीप डाकवे व डाकवे परिवार यांनी राबवलेले उपक्रम नक्कीच अभिनंदनीय आहेत. या उपक्रमाला शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार ॲड.जनार्दन बोत्रे, बाळासाहेब कचरे, प्रा.ए.बी.कणसे, आई गयाबाई डाकवे, पत्नी सौ.रेश्मा डाकवे, भरत डाकवे, आप्पासोा निवडूंगे तसेच स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभते.
स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट सोबत डाॅ.संदीप डाकवे आपल्या अंगभूत कलेच्या माध्यमातून पूरग्रस्त, नैसर्गिक, राष्ट्रीय आपत्तीच्यावेळी निधी संकलन करुन आपला खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करत असतात. शेतकरी कुटूंबातील अवधूत माळी याला उच्च शिक्षणासाठी दिलेल्या छोटयाशा मदतीबद्दल स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या संवेदनशीलपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

स्पंदन ट्रस्टकडून पुरग्रस्तांना झालेली मदत :
केरळ पुरग्रस्तांना 21 हजार
मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 3 हजार
चि.स्पंदन कडून खाऊच्या पैशातून पूरग्रस्तांना शैक्षणिक साहित्य वाटप
इर्शाळवाडी पुरग्रस्तांना रु.5,000/- ची मदत
तांबवे पुरग्रस्तांसाठी एक टेम्पो जीवनावश्यक, शैक्षणिक साहित्य
जितकरवाडी (जिंती) स्थलांतरीतांना राजगिरा लाडू, शैक्षणिक साहित्य वाटप

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top