ताज्या बातम्या

वाशीमध्ये ‘हर घर संविधान’चा बुलंद नारा; अग्नेल लॉ कॉलेजची भव्य रॅली उत्साहात पार

नवी मुंबई : अग्नेल स्कूल ऑफ लॉ, वाशी तर्फे भारतीय संविधानाच्या ७६व्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत आज संविधान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. “हर घर संविधान” हा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ही रॅली मोठ्या उत्साहात पार पडली.

अग्नेल स्कूल ऑफ लॉपासून सुरू झालेली ही रॅली वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहोचली. विद्यार्थ्यांनी हातात संविधानाविषयी संदेश असलेले फलक घेऊन समाजात कायदेविषयक जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन केले.
या रॅलीसोबत विद्यार्थ्यांनी नुक्कड नाट्य सादर करून नागरिक म्हणून संविधानात दिलेल्या हक्क व कर्तव्यांची महत्त्वपूर्ण माहिती उपस्थितांपर्यंत पोहोचवली.

कार्यक्रमाला डॉ. अम्बरीष पाटणकर, संचालक व भू.उपआयुक्त, एनएमएमसी यांनी मार्गदर्शन केले. तर डॉ. राजेश अनंत साखरे, कार्यवाहक प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत संविधान दिन ही केवळ औपचारिकता नसून नागरिकत्वाची जाणीव दृढ करणारा दिवस असल्याचे सांगितले.

कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी, प्राध्यापक व नागरिक सहभागी झाले. संविधान दिनानिमित्त पार पडलेला हा उपक्रम वाशी परिसरात संविधान मूल्यांचा संदेश प्रभावीपणे पोहोचवत यशस्वी ठरला.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top