प्रतिनिधी : रयत विद्यार्थी विचार मंच पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष अक्षय चव्हाण यांच्या प्रयत्नातून व स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप डाकवे यांच्या सहकार्याने काळगाव डाकेवाडी येथे आज एका गरजवंत दिव्यांग बांधवाला व्हीलचेअर चे वितरण करण्यात आले. या उपक्रमात BEAST ERA कंपनीचे CEO व मॅनेजिंग डायरेक्टर दीपक यादव यांचे विशेष सहकार्य लाभले.
सकाळी ५.३० ला घराबाहेर पडून ९ वाजता काळगाव डाकेवाडी येथे पोहोचत अक्षय चव्हाण यांनी स्वतः व्हीलचेअर सुपूर्द केली. “कोणतेही काम एकट्याने होत नाही — एकीची ताकद मोठी असते” हा संदेश देत त्यांनी संदीप डाकवे व दीपक यादव यांचे मनःपूर्वक आभार मानले.
दिव्यांग बांधवाच्या चेहऱ्यावर आलेले आनंदाश्रू हेच खरे पुण्य असल्याचे सांगत अक्षय चव्हाण म्हणाले — “हा आनंद पैशाने विकत घेता येत नाही… त्यांच्या आशीर्वादासारखे दुसरे सुख नाही.”




