ताज्या बातम्या

सातारा पालकमंत्र्यांच्या पोलिस गार्डला पत्रकारांनी सुनावले खडे बोल..

सातारा(अजित जगताप) : सातारा जिल्ह्यातील विशेष वार्तांकन करणाऱ्या एका धाडसी तरुण पत्रकाराने पत्रकार परिषदेचा निरोप आल्यामुळे सातारा शहरातील पालकमंत्री यांच्या बंगल्यामध्ये दुपारी एक वाजता प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या ठिकाणी असलेल्या पोलिस गार्डने त्यांना अडवले. त्यावेळी अगोदरच संतप्त झालेल्या तरुण पत्रकारांनी खडे बोल सुनावले .
पत्रकार परिषदेचा निरोप असल्यामुळे आलो आहे. इथे कधीच येत पण नाही आणि मत पण नोंदवत नाही. असं सांगून आपल्या अवमानाचा बदला घेतला.
याबाबत माहिती अशी की, पालकमंत्र्यांची पत्रकार परिषद ही कधीही वेळेत नसते. प्रत्येक वेळी वेळ बदलावी लागते. याचा अनुभव
असून दोन पत्रकार दुपारी एक वाजता पालकमंत्र्यांच्या सातारा शहरातील नाक्या नजीकच्या निवासस्थानी गेले होते. त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी गेट जवळ असलेल्या एका पोलीस गार्डने वैतागलेल्या अवस्थेत काय काम आहे? कुठून आला? असा त्या पत्रकाराला दमच दिला. त्यामुळे अगोदरच
मित्तभाषी असलेल्या त्या पत्रकाराने आपले कोयना नदीचे खरे रूप दाखवले.
सन्माननीय सातारा जिल्हा पालकमंत्री पत्रकार परिषदेत एक वाजता आहे. असा निरोप आल्यामुळे आलेलो आहे. नाहीतर इथे चारचौघ व्यतिरिक्त कोणी फिरकत सुद्धा नाही. मी येत नाही आणि मतही नोंदवत नाही. असे ठणकावून सांगण्यास ते विसरले नाही. आचारसंहिता असल्यामुळे बंगल्यामध्ये पत्रकार परिषद घ्यावी लागली याची आठवण करून दिली. दरम्यान, याबाबत पालक मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक आदरणीय सुनील गाडे यांनी पत्रकार परिषदेचा निरोप दीड वाजता आहे. असं सौजन्याने सांगितले. त्यामुळे त्या पत्रकारांचा राग शांत झाला. सदर पत्रकार रस्त्याच्या पलीकडे असलेल्या ठिकाणी झटक्याने गेले. आदरणीय पालकमंत्री हे खूप चांगले निर्णय घेतात. परंतु, त्यांच्या अवतीभवती असणारे काही जबाबदार व्यक्ती बेजबाबदारपणाने ओळख नसल्याने पत्रकारांशी वागत असतात . काही मीडिया बद्दल पालकमंत्री यांना गैरसमज करून दिला जात आहे. अशी पुष्टी त्यांनी जोडली. दुपारी दीड वाजता फक्त प्रिंट मीडियाच्या प्रतिनिधींची पत्रकार परिषद हा घेतलेल्या निर्णयाचे मात्र सर्वांनी स्वागत केले आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top