ताज्या बातम्या

मेढा नगरपंचायतीमध्ये कमळ फुलवण्यासाठी अपक्ष – राष्ट्रवादी- शिवसेना स्वतंत्र लढती…

मेढा(अजित जगताप) : जावळी तालुक्यातील महत्त्वाचे केंद्रस्थान असलेल्या मेढा नगरपंचायतीची सत्ता हस्तगत करण्यासाठी राजकीय महत्त्वकांक्षा दिसून आली. परंतु, प्रत्यक्षात निवडणुकीमध्ये मेढा नगरपंचायतीमध्ये कमळ फुलवण्यासाठी अपक्षांसोबतच शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना स्वतंत्र लढत देत आहेत. मतदानापूर्वीच भाजपच्या दोन जागा बिनविरोध निवड झाल्याचे निश्चित झाली आहे.
सत्ताधारी पक्ष म्हणजेच राजकीय पक्ष अशी ओळख असलेल्या मेढा
नगरपंचायतीची बनली आहे . पूर्वी काँग्रेस व शिवसेना पक्षाची निष्ठा अनेकांनी दाखवून दिली होती. आजही निष्ठावंत आहेत. आता सबका साथ.. सबका विकास.. मेढा नगरी राहू द्या भकास… असेच चित्र दिसत असल्याची प्रथमदर्शनी वाटत आहे.
मेढा नगरीच्या परिपूर्ण शाश्वत विकासासाठी जादूची कांडी फिरल्याशिवाय विकास होणार नाही. हे मतदारांनाही माहिती आहे. त्यामुळे दुरंगी असो,, तिरंगी असो,, किंवा बिनविरोध निवड असो,, त्याचं काहींना देणे घेणे नाही. हे सुद्धा स्पष्ट झाले आहे.मेढा नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी २० अर्ज दाखल केलेले उमेदवारांनी आपली उमेदवारी मोठ्या मनाने मागे घेतली. मात्र, राष्ट्रवादी व शिवसेना व अपक्षांनी जिद्द ठेवून मैदानात मताची विभागणी झाली तरी चालेल. पण, निवडणूक लढवणार हा निश्चय केला आहे. त्याच्या सर्वत्र स्वागत होत आहे.
लोकशाही मानणाऱ्या सर्वच घटकाला नेमका फायदा की तोटा? हे सुद्धा भविष्यात मतपेटीतून दिसून येणार आहे. मताची विभागणी होणार हे स्पष्ट झाल्याने भाजप प्रचारक उमेदवारांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे. याबाबत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अनेक जण विश्लेषण करतील. त्यापूर्वी होणारी चर्चा मेढा नगरीमध्ये घराघरात पोहोचली आहे. निकालाचा अंदाज अनेकांना आतापासूनच आला आहे. एक्झिट पोलची आवश्यकता राहिलेली नाही.
मेढा नगरीत भाजप, शिवसेना
आणि राष्ट्रवादी काँग्रेस( श. प.
पक्ष) अशी तिरंगी लढत होणार आहे.
दरम्यान, भाजपच्या दोन उमेदवारांची
बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे
१५ प्रभागांमध्ये ४१ उमेदवार रिंगणात आपापल्या परीने प्रचार करून रंगत भरत आहेत.
मेढा नगरपंचायतीच्या पंचवार्षिक
निवडणुकीत प्रभाग क्र. चारमध्ये
भाजपच्या छकुली रावसाहेब देशमुख
व प्रभाग क्र. पाचमध्ये आनंदी यशवंत
करंजेकर या बिनविरोध निवडून येणार आहेत. कारण त्यांच्या प्रतिस्पर्धीने निवडणुकीतून माघार घेतली आहे. मेढा नगरीतील ४१ उमेदवारांच्या मध्ये सुरस निर्माण झालेली आहे.
एका बाजूला महायुतीतील घटक पक्ष भाजप व शिवसेना आणि रिपब्लिकन पक्ष आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी मधील राष्ट्रवादी व इतर पक्ष असा सरळ सामना होईल. अशी शक्यता दुरावली होती. अपेक्षेनुसार तिरंगी लढत होत असून तीन तिघाड काम बिघाड होण्याची शक्यता आहे. काही अपक्ष निश्चितच बाजी मारतील. असेही चित्र दिसत आहे.
मेढा नगरपंचायत निवडणुकीत प्रचारामध्ये नेमकी कोणी कोणावर टीका करावी? याचा पायपुस राहिलेला नाही. बेकायदेशीर दारूधंदे, मटके, अतिक्रमण याला तिन्ही पक्ष जबाबदार आहेत. मग, मेढा नगरीच्या सुज्ञ मतदारांनी मतदान तरी कुणाला करावे? जर मत द्यायचे मग हे मत फुकट का दिले पाहिजे ? जिथे उमेदवार पसंद नाही तिथे नोटा हा पर्याय आहे. असा ही सुज्ञ मतदारांना प्रश्न पडलेला आहे. एकूणच मेढा नगरीची निवडणूक ही मतांच्या विभागणीने राजकीय पक्षांसाठी गुलालाची तयारी की काही प्रभागातील पराभवाचा दणका हे स्पष्ट होणार आहे.

_____________________________________

चौकट — मेढा नगरपंचायतीच्या वतीने लाख रुपये खर्च करून स्वच्छतेचा संदेश देणारा फुगा लटकवण्यात आला. या फुग्यामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या मेढा मुख्याधिकारी मुख्यधिकाऱ्याची बदली झाली. पण, कारवाई झाली नाही. आता हेच पुन्हा नगरपंचायत निवडणुकीत पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारत आहेत. असे सुज्ञ मतदारांनी सांगितले.

—- —— ——– —— ——- ——- —– —
फोटो– मेढा नगरपंचायत कार्यालय

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top