
प्रतिनिधी : महाबळेश्वर – जावली तालुक्यातील मुंबई – नवी मुंबई – ठाणे व पनवेल विभागातील मुंबईकर रहिवाशांच्या उन्नती करिता व विचारांची देवाण-घेवाण करण्याकरिता महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानच्या प्रमुख पदाधिकारी व सभासद यांची बैठक वाशी नवी मुंबईतील कांदा बटाटा मार्केट येथे संपन्न झाली .
आमशी गावचे ज्येष्ठ नागरिक व प्रतिष्ठानचे मार्गदर्शक श्रीरंग मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेमध्ये आपल्या प्रत्येक गावांतील विकास कामासंदर्भात विचार विनिमय व चर्चा करण्यात आली .
महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानच्या वतीने आतापर्यंत राबविण्यात आलेले सामाजिक /शैक्षणिक / सांस्कृतिक / कला / क्रीडा / सहकारी /कृषी / अध्यात्मिक तसेच इतर विविध विधायक उपक्रम व कार्यक्रम याविषयी आढावा घेण्यात आला .तसेच पुढील कालावधीत काय काय उपाययोजना कराव्यात त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली .
वाई महाबळेश्वर खंडाळा तालुक्याचे स्थानिक आमदार – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी प्रत्येक गावागावात केलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यात आला त्या अनुषंगाने महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व सभासदांनी मकरंद आबांच्या पाठीशी ठामपणे पाठबळ देण्याचे एक विचाराने ठरविण्यात आले .
बैठकीला उपस्थित असणाऱ्या प्रत्येक गावातील प्रतिनिधींनी आपापले विचार मांडले .
प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष राजेंद्र मोरे, सचिव रमेश संकपाळ सर, संघटक विष्णु शिंदे सर, सल्लागार गोविंदशेठ शिंदे, आनंदा सकपाळ, बापू कदम, संतोष कदम, राजू शिंदे, गोविंद भोसले, यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले . प्रतिष्ठानचे उपाध्याक्ष श्री राजेंद्र मोरे यांनी आभार मानले .
उपस्थितां करिता चहापाणी व बैठक व्यवस्था नारायण शिंदे, संतोष संकपाळ, संजय मोरे, राजेश देसाई यांच्या सौजन्याने केले गेले .




