मुंबई (शांताराम गुडेकर) : विक्रोळी पार्क साईट येथील गुणवंत कामगार पुरस्कार-महाराष्ट्र शासन विजेते तसेच त्यांच्या पर्यावरण, शैक्षणिक, सामाजिक कार्याची दखल घेऊन श्री. श्रीराम विष्णू वैद्य यांना साऊ ज्योती सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने “राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार -२०२५ ने सन्मानित करण्यात आले.
साऊ ज्योती सामाजिक संस्था महाराष्ट्र यांचा दि. १६ नोव्हेंबर रोजी भारत इतिहास संशोधन मंडळ पुणे येथे राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार वितरण सोहळा
उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रा. डॉ. शंकर अंदानी (साई इंडियन ट्रस्ट असो. न्यू दिल्ली अध्यक्ष ऐलिट चेंबर कॉमर्स इंडस्ट्री), मा. पुनम पाटील पोलीस उपनिरिक्षक, पुणे शहर, मा. युवराज कुमार मराठी सिने अभिनेता, मा. केतकी
गावडे अभिनेत्री, साऊ ज्योती संस्थेचे संस्थापक सचिन हाळदे, आयोजक विकास उबाळे, मा.संदीप रमेश शर्मा, (शिवसेना उपशहर प्रमुख नाशिक), मा. विष्णू देशमुख पोलीस सबइन्स्पेक्टर, मा. प्रफुल्ल सरोदे स्वीय सहाय्यक श्री. प्रतापराव जाधव केंद्रीय मंत्री इत्यादी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.श्रीराम वैद्य हे गेली ४५ वर्ष सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. अनेक संघटनांवर पदाधिकारी,सदस्य म्हणून काम पाहत आहेत.त्यांना आजवर विशेष कार्यकारी अधिकारी,गणुवंत कामगार पुरस्कार, आदर्श मित्र पुरस्कार, राष्ट्रीय सामाजिक एकता गौरव पुरस्कार, मुंबई रत्न पुरस्कार, समाज गौरव पुरस्कार, कोकण दिप सामाजिक सेवा पुरस्कार, कामगार भूषण पुरस्कार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रयत सेवक पुरस्कार, आदर्श मुंबईकर महापौर सन्मान पत्र, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे गौरव पत्र, नशाबंदी मंडळ नागरिक समिती गौरवपत्र, रक्तदान शिबिर प्रशस्तीपत्र, कामगार सभा आकाशवाणी मुलाखत, नागरी संरक्षण दल, बृहनमुंबई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप, स्वकुळ वैभव पुरस्कार व संकल्प कृतार्थ जीवन गौरव पुरस्कार आदी पुरस्कार मिळालेले आहेत.ते कार्यकारी सदस्य महाराष्ट्र गुणवंत कामगार संघटना मुंबई,रायगड जिल्हा स्वकुळ साळी सेवा मंडळ मुंबई चे सदस्य आहेत.नेत्र तपासणी व चष्मा वाटप, एडस जनजागृती अभियान, पोलीओ डोस अभियान, बाल माता संगोपन शिबीर, शारीरिक वैद्यकिय तपासणी, मार्गदर्शन व उपचार केंद्र आदी शिबीर मध्ये त्याचा मोलाची कामगिरी आहे.शिवसेना ग्राहक संरक्षण मंच, गुरूदत्त मंडळ (कला, क्रिडा, शैक्षणिक) वि. पा. शा. मुंबई सल्लागार, वि. पा. सा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ – सदस्य आहेत.श्री.श्रीराम विष्णू वैद्य (विशेष कार्यकारी अधिकारी,(डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलो शिप विजेता)यांना सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आल्यामुळे त्याच्यावर अभिनंदनसह शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.




