मुंबई (उत्कर्ष गुडेकर) : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या सह्याद्रीचा प्रतिकैलास श्रीक्षेत्र मार्लेश्वर परिसरातील आंगवली-रेवाळेवाडीचे सुपुत्र विक्रोळी पश्चिम पार्क साईट येथील रहिवासी दै. अग्रलेखचे मुंबई/कोकण विभागीय संपादक, वृत्तपत्रलेखक शांत्ताराम लक्ष्मण गुडेकर ( Ex.S.E.O)यांची स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचे संस्थापक संजय कोकरे यांनी नुकतीच “कोकण रत्न पदवी पुरस्कार साठी अधिकृत घोषणा केली आहे.गुडेकर यांना हा पुरस्कार शनिवार दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत मराठी पत्रकार भवन, आझाद मैदान शेजारी, मुंबई येथे होणारा हा कार्यक्रम संस्थेचे संस्थापक संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक सचिन कळझुनकर सर उपस्थित राहणार आहेत. तसेच या संस्थेचे मुंबई अध्यक्ष धनंजय कुवेसकर, खजिनदार राजेंद्र सुर्वे, नेते सुभाष राणे आणि सल्लागार दिलीप लाड हेसुद्धा या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत.शिवाय विविध क्षेत्रातील मान्यवरांना देखील या दरम्यान कोकण रत्न पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
शांत्ताराम गुडेकर यांना महाराष्ट्र शासनाने “विशेष कार्यकारी अधिकारी” म्हणून २०१२ ते २०१७ या काळावधीसाठी नियुक्त केले होते.त्यांना डाँ.बाबासाहेब आंबेडकर फँलोशिप पुरस्कार -दिल्ली प्राप्त झालेला आहे.ते महाराष्ट्र शासनाच्या नागरी संरक्षण दल-एन विभाग-क्षेत्र-३ मध्ये स्वयंसेवक म्हणून कार्यरत होते.शिवाय महाराष्ट्र शासन अनुदानित नशाबंदी मंडळ- महाराष्ट्र राज्य या मंडळतर्फे नशाबंदी चे काम करतात.कोकण विभाग पत्रकार संघ मुंबई जिल्हा सचिव म्हणून ते काम पाहिले असून त्यांना नगर मित्र,आदर्श समाजसेवक ,समाजरत्न , दक्ष नागरिक ,कोकण भूषण ,वृत्तदिप पुरस्कार ,महापौर गौरवपत्र तसेच सोनी टि.व्ही वरील सी.आय.डी मालीकेला वर्धापनदिनानिमि आयोजित कार्यक्रमात शांत्ताराम गुडेकर यांना “स्थानिक हिरो” सी.आय.डी मेडल व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आलेले आहे.
शांताराम गुडेकर महाराष्ट्र हरित सेना, वन विभाग, महाराष्ट्र शासन चे सदस्य, माझी वसुंधरा, महाराष्ट्र शासन चे सदस्य आहेत. शिवाय माहिती अधिकार, पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण सेना चे मुंबई जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आहेत.अखिल भारतीय पत्रकार हक्क संसद समिती चे मुंबई उपनगर सचिव आहेत.शांत्ताराम गुडेकर यांची कोकण रत्न पदवी -२०२५ साठी निवड झाल्याबद्दल स्वतंत्र कोकण राज्य अभियानचे अध्यक्ष श्री.संजय कोकरे आणि मुंबई/कोकण पदाधिकारी, सदस्य तसेच अनेक संस्था ,प्रतिष्ठान,संघ व शैक्षणिक ,राजकीय ,सामाजिक ,वृत्तपत्रलेखक संघटना,पत्रकार मंडळीच्या वतीने अभिनंदनासह शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.




