मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवार,
दि. १५ नोव्हेंबर, २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता आशिष शेलार यांच्या हस्ते आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, कार्यवाह शैलेंद्र शिर्के आणि विश्वस्त राही भिडे, अजय वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिशय कौटुंबिक वातावरणात उत्साहात संपन्न झाले.
महाराष्ट्राला दर्जेदार दिवाळी अंकांची परंपरा आहे. ही परंपरा सातत्याने जपण्याचे कार्य मुंबई मराठी पत्रकार संघ अतिशय चांगल्या प्रकारे करीत आहे. दिवाळी अंक प्रदर्शनात उत्तमोत्तम अंक आपल्याला इथे पहायला मिळतात, अशा शुभेच्छा यावेळी आशिष शेलार यांनी दिल्या. मुंबई मराठी पत्रकार संघाचा पत्रकार दर्पण हा दीपावली विशेषांक सुद्धा अत्यंत दर्जेदार असल्याची प्रशंसा त्यांनी केली.
हे प्रदर्शन मंगळवार, दि. १८ नोव्हेंबर, २०२५ पर्यंत सकाळी ११ ते संध्याकाळी ८ या कालावधीत साहित्यप्रेमींसाठी खुले आहे.




