ताज्या बातम्या

जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेला अक्षय बनला वर्ग एकचा अधिकारी

सांगली(अमोल पाटील) : शाहूवाडी तालुका रा. गोंडोली येथील अक्षय भगवान पाटील यांनी महाराष्ट्रात लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये ४८ व्या रँकने उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले आहे. त्याची राजपत्रित अधिकारी वर्ग एक पदी निवड झाली आहे. त्यांच्यामुळे कोल्हापूर तालुक्यात लोकांच्या भुवया उंचावल्या असून सर्व ठिकाणी कौतुक व अभिनंदन यांचा वर्षाव होत आहे.

प्राथमिक शिक्षण विद्या मंदिर गोडोली व माध्यमिक शिक्षण विश्वास विद्यानिकेतन चिखली तर पदवीचे शिक्षण प्रोडक्शन इंजिनिअर के आय टी कॉलेज कोल्हापूर येथे झाले.
घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे वडील मुंबई येथे खाजगी नोकरीत काम करते. या परिस्थितीची जाणीव ठेवून १४ ते १५तास अभ्यास करत असे. पहिल्यापासून अक्षयचा प्रत्येक वर्गात पहिला नंबर असायचा. अक्षयला वेळोवेळी लाभलेले योग्य मित्र, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनातून अक्षयला यश प्राप्त झाले.
आई-वडिलांनी अक्षय वर चांगल्या पद्धतीचे संस्कार केल्यामुळे व गरिबीची जाण असल्यामुळे अक्षय ला यश प्राप्त झाले. वेळेचा व संधीचा फायदा घेत अक्षय अधिकारी बनला. यातूनच जिल्हा परिषद शाळेतून शिकलेल्या विद्यार्थी वर्ग एकचा अधिकारी बनला. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top