ताज्या बातम्या

काव्यवाचन स्पर्धत नारायण लांडगे नवी मुंबईतुन प्रथम

नवी मुंबई : शिक्षक व अधिकारी यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने विविध स्पर्धचे आयोजन राज्यभरात केले गेले आहे. यामध्ये स्वरचित काव्यवाचन स्पर्धत नवी मुंबई महानगरपालिकेतील शिक्षक नारायण वसंतराव लांडगे यांनी महिला सबलीकरण, शिक्षण यावर प्रबोधनात्मक भाष्य करणारी ‘साऊ’ ही कविता सादर करत प्रथम क्रमांक पटकावला. सदरील स्पर्धा विवेकानंद संकुल याठिकाणी पार पडली. या स्पर्धेच्या सुंदर आयोजनासाठी केंद्र समन्वयक महेंद्र पाटील, मुख्याध्यापक ऋतुजा गवस यांनी मेहनत घेतली. त्यांच्या या यशाबद्दल मा. उपायुक्त (( शिक्षण) संघरत्ना खिल्लारे मँडम, मा. शिक्षणाधिकारी अशोक कडुस साहेब, मा. विस्तार अधिकारी सुलभा बारगरे मँडम, मा. केंद्र समन्वयक रमेश तेली, मा. मुख्याध्यापक जयप्रकाश पाल यांसह नवी मुंबईतील शिक्षण विभागासह इतर सर्वांनी अभिनंदन केले आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top