ताज्या बातम्या

नवी मुंबईतील शाळांमध्ये बालदिनानिमित्त विविध उपक्रम उत्साहात साजरा

प्रतिनिधी :


भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये बालदिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. बालदिनानिमित्त शाळा स्तरावर विविध स्पर्धांचे व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना शाळेकडून गोड खाऊ वाटण्यात आला. चॉकलेट देण्यात आली. गुलाबाची फुले वाटप करण्यात आली. त्याचप्रमाणे भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

याप्रसंगी शाळा स्तरावर विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. काही शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा घेतल्या गेल्या. नमुंमपा शाळा क्रमांक 93, सीबीएससी स्कूल यांनी विद्यार्थ्यांना कार्टून चित्रपट दाखविला. शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे नृत्य, गायन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थी अत्यंत उत्साहाने आनंददायी खेळात सहभागी होऊन बालदिनाचा आनंद लुटला. याप्रसंगी शिक्षकही विद्यार्थ्यांमध्ये लहान होऊन सहभागी होत बालदिनाचा आनंद घेताना दिसून आले. काही शाळांमध्ये विविध विषयांवर पथनाट्यसुद्धा सादर झाली. बालदिनाचे औचित्य साधून शिक्षकांनी अध्यापनासह विविध उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांसमवेत अत्यंत आनंदाने बालदिन साजरा केला

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top