कराड(प्रताप भणगे) : विठोबाचीवाडी, ता. कराड गावातील तरुण वर्गाने दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीच्या उत्कृष्ट उदाहरणातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठोबाचीवाडीला आज स्पोर्ट्स किट, लाईट फिटिंग साहित्य आणि दोन आरसे असे आवश्यक साहित्य प्रदान करण्यात आले. गावातील शाळा ही सर्वांची आपुलकीची जागा मानत तरुणांनी पुढाकार घेत सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे.शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्पोर्ट्स किट देण्यात आले असून यासाठी वैभव मलगौंडे यांनी ₹७५०० चे विशेष सहकार्य केले. तर संकेत खोत व जगदीश करांडे यांच्या योगदानातून शाळेसाठी दोन आरसे (₹९५०) देण्यात आले. नव्याने बांधण्यात आलेल्या मल्टीयुनिट शौचालयासाठी आवश्यक लाईट फिटिंग साहित्य (₹२२००) विनायक करांडे, आनंदा खोत, आकाश जामदार, आदित्य चव्हाण व अशोक भणगे यांनी उपलब्ध करून दिले.या उपक्रमासाठी गावातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. अवधूत करांडे, अशोक भणगे, दिपक करांडे, शुभम खोत, महेश चव्हाण, प्रताप भणगे यांच्यासह सर्व तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तसेच कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री. पांडुरंग पवार, श्री. दिलीप पाटील, सर्व शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. माधुरी चव्हाण, ग्रा. सदस्य अश्विनी चव्हाण, मदतनीस सौ. आरती चव्हाण, प्रशांत चव्हाण तसेच ग्रामस्थ आणि पालक उपस्थित होते.




