कराड(अमोल पाटील) : दरवर्षीप्रमाणे व्यंकनाथ देवाच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांचे मैदान रविवार दिनांक १६ ऑक्टोंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. प्रथम क्रमांकात सतपाल सोनटक्के विरुद्ध धनाजी कोळी यांच्यात लढत होणार आहे.
या मैदानामध्ये पैलवान नामदेवराव मोहिते, पैलवान ज्ञानेश्वर दंगेकर, धनाजी कटकर, सचिन पाचुपते, रामदास शिंगारे, अभिजीत लोहार, डॉक्टर संजय कुंभार या मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे.
काले येथील कुस्ती मैदानासाठी माजी आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार शंभूराज देसाई, खासदार नितीन काका पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, उदयसिंह पाटील, दीपक शेठ लोखंडे, शिवराज मोरे, मनोहर शिंदे, राजेंद्र सिंह यादव, इंद्रजीत चव्हाण, चंद्रावर पाटील जयवंत जगताप राजेश पाटील नरेंद्र नांगरे पाटील संतोष वेताळ बाबासाहेब बागल या प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती राहणार आहे. या कुस्ती मैदानाचे सर्वेसर्वा पैलवान नानासाहेब पाटील यांच्या संयोजनाने कुस्ती मैदान पार पडणार आहे.या मैदानात चटकदार कुस्त्या होणार असल्यामुळे कुस्ती कुस्ती शौकिनांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.




