ठाणे : भारताचे पहिले पंतप्रधान व भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या १३७व्या जयंतीनिमित्त, उद्या शुक्रवार, दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी, धर्मराज्य पक्षाच्या वतीने भव्य सांजफेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
या फेरीचे नेतृत्व पक्षाध्यक्ष मा. राजन राजे स्वतः करणार असून, सांजफेरीची सुरुवात सायंकाळी ४.०० वाजता धर्मराज्य पक्षाच्या कार्यालयापासून होईल. ही फेरी मीनाताई ठाकरे चौक (कॅसल मिल) येथील पं. जवाहरलाल नेहरु यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ समाप्त होणार आहे.
या प्रसंगी काँग्रेस पक्षाच्या अर्थशास्त्र विभागाचे अध्यक्ष मा. विश्वास उटगी, तसेच ठाणे शहरातील विविध संस्था व संघटनांचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
पं. नेहरु यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या सांजफेरीत नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक कार्यक्रमास गौरव द्यावा व प्रसिद्धीस सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



