कराड : सवादे (ता. कराड) येथील कै. यशोदा तातोबा शेवाळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने सवादे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पुत्र पैलवान संतोष शेवाळे, पैलवान दिलीप शेवाळे तसेच जिल्हा बँक विस्तार अधिकारी मारुती शेवाळे आहेत. मातोश्रींनी आयुष्यभर संसाराचा गाडा समर्थपणे हाकत मुलांना शिक्षण व पैलवान क्षेत्रात घडविण्याचे मोलाचे कार्य केले.
त्यांचा रक्षा विसर्जन कार्यक्रम शुक्रवार, दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता सवादे येथील वैकुंठधाम येथे होणार आहे.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.




