Tuesday, November 11, 2025
घरमहाराष्ट्रदिपगंगा भागीरथी आणि दीपस्तंभ शैक्षणिक संस्थेतर्फे कु. सायली भोसले यांचा महासत्कार..!

दिपगंगा भागीरथी आणि दीपस्तंभ शैक्षणिक संस्थेतर्फे कु. सायली भोसले यांचा महासत्कार..!

सांगली(विजया माने) : थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक योगदानाने प्रभावित होऊन, शंभर वर्षांपूर्वी शिवाजी विद्यापीठ या नांवाने भारतातील पहिले महिला विद्यापीठ स्थापन करून, महिला सक्षमीकरणासाठी सक्रियपणे कार्य केलेला, कोल्हापूर संस्थानचा पहिला द्रष्टा राजा. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जन्मभूमी, कर्मभूमी असलेला कोल्हापूर जिल्हा. याच कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक कसबा बावडा येथील कु. सायली रुपाली किरण भोसले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC ) मार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा २०२४ मध्ये राजपत्रित वर्ग – १ अर्थात पोलीस उपअधीक्षक पदी निवड झाली. विशेषतः राज्यसेवा परीक्षेत शाहूनगरीतील या भीमकन्येने अनुसूचित जाती प्रवर्गातील मुलींमध्ये महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक मिळवून, अतुलनीय असे यश संपादन केले.
या सन्मानार्थ दीपस्तंभ शैक्षणिक संस्था, कोल्हापूरचे संस्थापक, अध्यक्ष मा. देवसर, दिपगंगा भागीरथी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, महाराष्ट्र राज्य संचलित… शारदा वृद्धसेवाश्रम, सांगली आणि कोल्हापूर या संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष तथा साहित्यिक, समाजसेवक हिंदरत्न डॉ. दिपक लोंढे यांचे वतीने… कु. सायली यांचे पालक तळबीड पोलीस ठाणेचे एपीआय मा. किरण भोसले साहेब, मा. रुपाली किरण भोसले वहिनी, समस्त भोसले परिवार तसेच छत्रपती हायस्कूल राक्षी, ता. पन्हाळाचे वरीष्ठ लिपिक मा. तानाजी दळवीसर आणि लोककवी रमेश नाईक यांचे साक्षीने कु. सायली भोसले यांना शॉल, पुष्पगुच्छ, संविधान पत्रिका आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आदरपूर्वक भेट देऊन गौरविण्यात आले.
दीपस्तंभ शैक्षणिक संस्था, कोल्हापूर आणि दिपगंगा भागीरथी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, महाराष्ट्र राज्य, संचलित… शारदा वृद्धसेवाश्रम, सांगली व कोल्हापूर आयोजित… दिपगंगा भागीरथी राज्यस्तरीय पुरस्कार – २०२५ करिता, “आदर्श मातापिता” विभागांतून, दिपगंगा भागीरथी राज्यस्तरीय “आदर्श पालक” पुरस्कार श्री. / सौ. भोसले उभयतांना, हिंदरत्न डॉ. दिपक लोंढे यांनी जाहीर केला. तर मा. देवसर यांनी कु. सायली भोसले यांची, “युवा प्रेरणा तथा युवा प्रशासक” विभागांतून, दिपगंगा भागीरथी राज्यस्तरीय “युवा प्रेरणा तथा नवं युवा प्रशासक” पुरस्कार – २०२५ या अत्युच्च मानाच्या अलौकिक अशा पुरस्कारासाठी दोन्ही संस्थेच्या वतीने, अभिनंदनीय निवड जाहीर करत भोसले परिवार आणि उपस्थितांची मने जिंकली.
तेंव्हा एपीआय मा. किरण भोसले साहेब आपले मत व्यक्त करतांना म्हणाले की, दिपगंगा भागीरथी राज्यस्तरीय पुरस्कार – २०२५ करिता आमची मुलगी कु. सायली आणि आम्हां उभयतांची निवड जाहीर केलीत, हा आम्हां भोसले परिवाराच्या आयुष्यातील सर्वोच्च मानाचा दुग्धशर्करा योगायोग असून या अविस्मरणीय सुवर्णक्षणी मी दोन्ही संस्थेचे आणि संस्थेच्या संस्थापक, अध्यक्ष यांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा