प्रतिनिधी – बिहार विधानसभा निवडणुकित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एन डी ए) चे सरकार प्रचंड बहुमताने पुन्हा निवडून येणार आहे.नितीश कुमार हे पुन्हा बहुमताने मुख्यमंत्री होतील.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलेल्या चांगल्या कामामुळे बिहार मध्ये एन डी ए चे सरकार निवडुन येणार आहे. बिहार मध्ये दलित जनतेचा कौल एन डी ए ला मिळणार असल्यामुळे बिहार मध्ये एन डी ए च्या अधिक जागा निवडुन येतील असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
बिहार मधील जमुई जिल्हात सिकंदरा विधानसभेचे हम पक्षाचे उमेदवार प्रफुल्ल मांजी यांच्या प्रचार सभेत ना.रामदास आठवले बोलत होते.यावेळी बिहार चे माजी समाज कल्याण मंत्री जनकराम आणि हम पक्षाचे नेते जीतनाराम मांझी आदि मान्यवर उपस्थित होते.
दलित मतांचा स्पष्ट कौल बिहार मध्ये एन डी ए च्या बाजुने लागणार आहे.या पुर्वी बिहार मध्ये एन डी ए च्या जेवढ्या जागा आल्या त्या पेक्षा अधिक जागा यावेळेस
निवडुन येतील.नितिश कुमार यांनी बिहार मध्ये चांगले काम केले आहे.सर्व समाज घटकांना न्याय देण्याचे काम प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांच्या नेतृत्वात होत आहेत.
रिपब्लिकन पक्ष हा एन डी ए च्या पाठिशी उभा आहे.रिपब्लिकन पश्रचे कार्यकर्ते गावागावात एन डी ए उमेदवारांचा प्रचार करित आहेत.रिपब्लिकन पक्षाचा भ्क्कम पाठिंबा एन डी ए सरकारला लाभला आहे.त्यामुळे बिहार मध्ये एन डी ए ला प्रचंड बहुमत मिळणार असल्याचा विश्वास ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केला.प्रफुल मांजी हे हम पक्षाचे कर्तबगार नेते असुन प्रफुल मांजी यांना या विधानसभा निवडणुकीत निवडुन देण्याचे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले.
