तापोळा(अजित जगताप) : कोयना धरणामुळे विस्थापित झालेल्या कांदाटी आणि सोळशी व तापोळा परिसरात शिवसागर जलाशय व जंगल आणि लोकवस्ती यांच्यामध्ये समन्वय आहे. परंतु काही वेळेला हिस्र प्राणी अचानक हल्ला करतात. अशावेळी प्रामाणिक व पाळीव कुत्रा जीवाची बाजी लावतो. रेनोशी गावातील ग्रामस्थांचे रक्षण करणारा गब्बर हा कुत्रा काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे अनेकांना अनावर झाले असल्याची माहिती सुशी गावचे सुपुत्र व सामाजिक कार्यकर्ते विलास शेलार यांनी दिली आहे.
याबाबत माहिती अशी की, अति दुर्गम व मागासलेल्या जावळी महाबळेश्वर खोऱ्यातील
रेनोशी गावाचा रक्षक शूर कुत्रा गब्बरला रात्रीच्या वेळी सर्वांना सुखाची झोप मिळावी यासाठी डोळ्यात प्राण आणून रक्षण करत होता. त्याबद्दल गावातील लोक जे अन्न देतील त्यावरच दिनक्रम ठरला होता. कधीही त्याने कोणालाही व्यक्तीचे नुकसान केले नाही. जंगली हिस्र प्राणी तसेच रानडुकर , गवा, बिबट्या, तरस, विंचू, नाग, साप, धामण , जळवा व चोरांपासूनही रक्षण केले होते.
प्रसिद्ध अशा शोले चित्रपटातील गब्बरच्या भूमिकेमुळे आजारांवर झालेले गब्बर हे व्यक्ती चित्रण कायमचा स्मरणात ठेवण्याचे काम रेनोशी येथील शेलार कुटुंबीयांनी केले होते. संतोष शेलार व त्यांच्या पत्नीने या गब्बर कुत्र्याच्या भरोशावर दुर्गम भागात पायी प्रवास केला होता. गब्बर सोबत असल्यामुळे कशाची भीती वाटत नव्हती. गेली दहा ते बारा वर्ष गावची सेवा करणारा हा सेवेकरी आज नाही. तरीही त्याची आठवण कायमची प्रत्येकाच्या हृदयात आहे.
रेनोशी गावातील वृद्ध आणि शेतकऱ्याचा विश्वासू साथीदार, जंगली श्वापदांपासून गावाचं रक्षण करणारा गब्बर काळाच्या पडद्याआड गेल्याचे दुःख अनेकांना वाटत आहे. तीन वेळा जंगली हिस्त्र प्राण्यांशी जीवाची बाजी लावून सामना करताना गब्बर कुत्रा गंभीर जखमी झाला होता, पण प्रत्येक वेळी तो पुन्हा नव्या उमेदीने उभा राहिला.
गब्बर हा फक्त एक कुत्रा नव्हता तो रेनोशी गावाची शान आणि ओळख होता. गावातील सार्वजनिक कार्यक्रम, लग्नसोहळे, यात्रांमध्ये गब्बर चे कोडकौतुक केले जात होते. शिवकालीन इतिहासामध्ये खंड्या नावाच्या कुत्र्याने इतिहास घडवला आहे. सातारा जिल्ह्यातील क्षेत्र माऊली येथे त्याचे स्मारक आहे. याची या निमित्त आठवण होत आहे.
—— ——- ——- —— —— ——- ——- ——- —–
फोटो– रेनोशी गावाचे रक्षण करणाऱ्या गब्बरची प्रतिमा
