नवी मुंबई : दत्तगुरू सेवा मंडळ, मुंबईची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी कळंबोली येथील संस्थेच्या कार्यालयात उत्साहात पार पडली. सभेचे उद्घाटन मा. श्री. शिवराम जिजाबा आदावडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. अध्यक्षस्थानी मा. श्री. हरिष किसन कदम होते.
या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मा. श्री. बबन पांडूरंग शिगवण, मा. श्री. अनंत कृष्णा पडयाळ, मा. श्री. प्रभाकर बाबाजी वारोशे आदी मान्यवर उपस्थित होते. सभेत संस्थेचा जुना हिशोब पडताळणी, दत्त जयंती उत्सवाचा नियोजन, तसेच संस्थेच्या भावी कार्ययोजनेवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाचा समारोप स्नेहभोजन व चहापानाने करण्यात आला. या सभेस मोठ्या संख्येने सभासद, वर्गणीदार व हितचिंतक उपस्थित राहिले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.
