प्रतिनिधी : महाबळेश्वर तालुक्यातील सोळशी विभागातील डॉ. अमोल कदम आणि डॉ. चिरंका कदम या दांपत्यांच्या “श्री समर्थ क्लिनिक” चे कोपरखैरणे, नवी मुंबई (सेक्टर १७) येथे उत्साहात शुभारंभ झाला.
ग्रामीण भागातील माथाडी कामगाराच्या मुलाने वैद्यकीय शिक्षण घेऊन तापोळा येथील शासकीय दवाखान्यात काही वर्षे सेवा दिल्यानंतर, सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी हे क्लिनिक सुरू करण्यात आले आहे.
शुभारंभ प्रसंगी नवी मुंबईतील विविध क्षेत्रातील मान्यवर, समाजसेवक आणि आरोग्य क्षेत्रातील व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी डॉ. अमोल आणि डॉ. चिरंका कदम यांच्या या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी सुयश सामाजिक व शैक्षणिक संस्था, नवी मुंबई आणि धगधगती मुंबई वृत्त मीडिया यांच्या वतीने “श्री समर्थ क्लिनिक” च्या उज्ज्वल यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
गोरगरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांपर्यंत माफक शुल्कात उत्कृष्ट आरोग्यसेवा पोहोचविण्याचा आमचा मानस आहे.
डॉ अमोल कदम
