प्रतिनिधी : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत आगामी निवडणुकांबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत.
मनसे सोबत युतीचा प्रश्न उपस्थित होत असताना पवारांनी स्पष्टपणे सांगितले की, आघाडीतील नेत्यांनी एकत्र बसून यासंदर्भात निर्णय घ्यायला हवा. काँग्रेसने लगेच टोकाची भूमिका घेऊ नये.
दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता राज आणि उद्धव ठाकरे अनेक कार्यक्रमांत एकत्र दिसल्याने व्यक्त केली जात आहे. जर ही युती झाली तर मनसे महायुतीत जाणार का, हा प्रश्न अधिकच गती घेत आहे.
पवार यांनी या चर्चेला उत्तर देताना महाविकास आघाडीतील नेत्यांनी एकत्र येऊन चर्चा करून निर्णय घ्यावा, असे सुचवले. मनसेला आघाडीत घेण्याबाबत काँग्रेसचा विरोध असल्याचेही त्यांनी मान्य केले.
त्याचवेळी, पार्थ पवार यांच्या कंपनीच्या जमीन व्यवहार प्रकरणावरही पवारांनी भाष्य केले. ते म्हणाले, या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. पार्थवर गुन्हा का नोंद नाही? याबाबत गृहमंत्री फडणवीस यांनी योग्य माहिती देणे आवश्यक आहे. त्यांनी चौकशी करून वास्तव समोर आणावे.
सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार चुकीचे नसल्याचे मत व्यक्त केले होते. त्यावर शरद पवार म्हणाले, “सुप्रिया सुळे यांचे मत वैयक्तिक आहे. पक्षाची अधिकृत भूमिका म्हणजे चौकशी होऊन सत्य समोर यायला हवे. कुटुंब वेगळं आणि राजकारण वेगळं आहे. आमच्या कुटुंबात निवडणुका एकमेकांविरोधात लढल्या आहेत.
