Sunday, November 9, 2025
घरमहाराष्ट्रजि.प. प्राथमिक शाळा विठोबाचीवाडी येथे मीना लादे मॅडम यांना निरोप व दिलीप...

जि.प. प्राथमिक शाळा विठोबाचीवाडी येथे मीना लादे मॅडम यांना निरोप व दिलीप पाटील सर यांचे स्वागत

कराड(प्रताप भणगे) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विठोबाचीवाडी (ता. कराड) येथे आज सौ. मीना राजेंद्र लादे मॅडम यांच्या निरोप समारंभासह नव्याने रुजू झालेल्या श्री. दिलीप पाटील सर यांचा स्वागत समारंभ उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापक श्री. पांडुरंग पवार सर यांनी केली.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. माधुरी सागर चव्हाण यांच्या हस्ते मीना लादे मॅडम यांचा सत्कार करण्यात आला, तर नव्याने रुजू झालेल्या श्री. दिलीप पाटील सरांचा सत्कार श्री. प्रशांत चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला.

मीना लादे मॅडम यांनी जवळपास पाच वर्षे या शाळेत सेवा बजावली. त्यांनी आपल्या मनोगतात शाळेतील अनुभव, गावकऱ्यांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांचे प्रेम याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तसेच सर्व विद्यार्थ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
नव्याने रुजू झालेले श्री. दिलीप पाटील सर यांनीही आपले विचार मांडत शिक्षक म्हणून प्रामाणिकपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रताप आबासो भणगे यांनी लादे मॅडम यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला अध्यक्षा माधुरी चव्हाण, लक्ष्मण पांडुरंग खोत (गुरुजी), स्वाती सुनील चव्हाण, संगिता दत्तात्रय खोत, सुलोचना संपत चव्हाण, प्रशांत चव्हाण, अश्विनी चव्हाण, सौ. आरती चव्हाण, संतोष चव्हाण, कु. प्रतिक खोत, विजय जामदार, तसेच सर्व आजी-माजी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन देखणे आणि भावपूर्ण झाले. हा सोहळा लादे मॅडम यांच्या कार्याचा सन्मान करणारा आणि नव्या शिक्षकाचे स्वागत करणारा आनंदसोहळा ठरला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा