Wednesday, November 5, 2025
घरमहाराष्ट्रप्रतापगड साखर कारखान्याच्या समोरच दारू विक्रीचा प्रताप....

प्रतापगड साखर कारखान्याच्या समोरच दारू विक्रीचा प्रताप….

सोनगाव(अजित जगताप) : सहकारी विना नाही उद्धार… हे घोषवाक्य सहकारी चळवळीचे प्रेरणास्थान आहे. परंतु, सध्या सहकारा विना नाही दारू उद्योग असा त्याचा अर्थ घेतला जात आहे. जावळी तालुक्यातील नामांकित प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या समोरच अवैद्यरित्या दारू विक्री होत आहे. याबाबत कोणीही तक्रार देण्यास पुढाकार घेत नसल्याने प्रतापगड समोरील प्रतापगड ढाबा चर्चेचा विषय बनला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यमुळे संपूर्ण जगभर प्रतापगड किल्ला ऐतिहासिक ठेवा बनला आहे . त्याच जावळी खोऱ्यातील सोनगाव-
नेवेकरवाडी व करदोशी गावच्या हद्दीमध्ये प्रतापगडच्या ऐतिहासिक साक्ष असलेल्या प्रतापगडचे नाव देऊन प्रतापगड सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला. या साखर कारखान्याच्या अनेक कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित राहतात. त्यावेळी तत्त्वज्ञान, विचार व सहकारी चळवळीतील योगदानाबद्दल माहिती दिली जाते.
याच प्रतापगड साखर कारखान्यासमोर अवैद्यरित्या दारू विक्री केली जाते. आणि या दारूच्या व्यसनापायी अनेक तरुण वर्ग तसेच साखर कारखान्याची कोणताही संबंध नसणारे या ठिकाणी येऊन नशापान करतात. ही चिंतेची बाब आहे. नशा पण करून वाहन चालवल्याबद्दल अपघाती घडले आहेत. वास्तविक पाहता प्रतापगड सहकारी साखर कारखाने मध्ये उसाचे गाळप केले जाते. काही वेळेला याच साखर कारखान्यातून मळीद्वारे दारू तयार केली जाते. आत मध्ये देशी दारू तयार होते आणि बाहेर विदेशी दारू विक्री होते. असा संगम पाहण्यास मिळत आहे.
याबाबत फक्त पोलीस यंत्रणाच जबाबदार आहे. असे नसून राज्य उत्पादन शुल्क व स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणणारे सहकार क्षेत्रातील अनेक जण दीप प्रज्वलन करतात. पण, अंधारात चालणाऱ्या दारू विक्री बाबत कुठलाही राव आवाज उठवत नाही. हीच खंत आहे. दरम्यान, यापूर्वी अनेकदा लेखी व तोंडी तक्रारी झालेली आहेत. परंतु अर्थकारणामुळे चार दिवस व्यवसाय बंद होतो. पाचव्या दिवशी दुपटीने दारू विक्री होते. असे राहाट सुरु असल्याची चर्चा परिसरात आहे. दरम्यान, याबाबत काही सहकार तज्ज्ञांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत भाष्य करण्यास नकार दिला आहे.

संपूर्ण जावळी तालुका दारूबंदी तालुका म्हणून कागदोपत्री मान्यताप्राप्त आहे. पण अशा पद्धतीने मोकाट दारू विक्री होत असल्याने जावळीचे नाव बदनाम करणाऱ्यांवर पोलीस यंत्रणेने कारवाई करावी. अन्यथा महसूल वाढीसाठी त्यांना परवानगी द्यावी हेच आता त्यांच्या हाती राहिले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments