मुंबई : ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर फिजिकली चॅलेंज्ड यांच्या वतीने शारीरिकदृष्ट्या दिव्यांग खेळाडूंसाठी आंतरराज्यीय ‘एलआयसी ट्रॉफी’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ५ ते ७ नोव्हेंबर २०२५ दरम्यान पोलीस जिमखाना, इस्लाम जिमखाना आणि हिंदू जिमखाना, मरीन लाइन्स, मुंबई येथे होणार आहे.
या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी होत आहेत. जम्मू-कश्मीर, हरियाणा, दि
ही टी-२० स्वरूपातील स्पर्धा असून ४०% शारीरिक दिव्यांग (ऑर्थोपेडिकली हँडीकॅप्ड) खेळाडूंसाठी सामने आयोजित करण्यात आले आहेत. या स्पर्धेला महाराष्ट्र राज्याचे क्रीडा उपसंचालक तसेच जी.टी. हॉस्पिटल, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य यांचे सहकार्य लाभले आहे.
