ताज्या बातम्या

छटपूजा सोहळ्यात मार्केट व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार

मुंबई : माता माहेश्वरी फळ मार्केट, राजेंद्रनगर, बोरिवली (पूर्व) येथे मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या छटपूजेच्या कार्यक्रमात माजी खासदार श्री. गोपाळ शेट्टी आणि आमदार श्री. संजय उपाध्याय यांच्या शुभहस्ते मार्केट व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. शाम कदम यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला सहाय्यक आयुक्त श्रीमती संध्या नांदेडकर, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या छटपूजा सोहळ्यामुळे परिसरातील सामाजिक आणि धार्मिक ऐक्य वृद्धिंगत झाले असून व्यापारी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top