Tuesday, November 4, 2025
घरमनोरंजनराज्यस्तरीय ‘लोकसंसद जनप्रेरणा शिखर पुरस्कार 2025’ सोहळा उत्साहात संपन्न; अभिनेत्री अलका कुबल...

राज्यस्तरीय ‘लोकसंसद जनप्रेरणा शिखर पुरस्कार 2025’ सोहळा उत्साहात संपन्न; अभिनेत्री अलका कुबल यांच्यासह के. रवी दादा यांची उपस्थिती

मुंबई : समाजातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करणारा राज्यस्तरीय “लोकसंसद जनप्रेरणा शिखर पुरस्कार सन्मान सोहळा 2025” हा भव्य कार्यक्रम मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, मंत्रालय समोर येथे अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेत्री अलका कुबल यांच्यासह के. रवी दादा उपस्थित होते.

या सन्मान सोहळ्याचे आयोजन क्रांती ग्राम विकास संस्था आणि विश्वनायक लोकसंसद फाउंडेशन, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने, अध्यक्ष श्री सुरेश यादव यांच्या संकल्पनेतून करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून
मा. ओमप्रकाश शेटे साहेब (अध्यक्ष – आयुष्मान भारत मिशन समिती, महाराष्ट्र राज्य),
अभिनेत्री अलका कुबल,अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड,
सिनेअभिनेते रोहित कोकाटे, समाजसेवी, वरिष्ठ पत्रकार आणि व्यावसायिक के. रविदादा आणि ॲड. शंकरजी चव्हाण हे मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार भिवंडीचे प्रतिष्ठित उद्योजक मा. छगन पाटील साहेब यांना प्रदान करण्यात आला.

तसेच राज्यभरातील विविध क्षेत्रांतील प्रेरणादायी कार्य करणाऱ्या समाजसेवक, शिक्षक, कलाकार, उद्योजक, पत्रकार आणि संस्थांना “लोकसंसद जनप्रेरणा शिखर पुरस्कार 2025” ने सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी सुहासिनी केकाणे, सुरज भोईर, अन्वित दास (सीईओ) तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात समाजसेवा, शिक्षण, आरोग्य, उद्योग, कौशल्य, कृषी आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी आयोजक सुरेश यादव यांनी सर्व उपस्थित मान्यवर, कलाकार, पत्रकार आणि सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
हा सोहळा नेहरू युवा केंद्र (भारत सरकार) संलग्न क्रांती ग्राम विकास संस्था, बीड यांच्या पुढाकारातून यशस्वीरित्या पार पडला.

समाजाला प्रेरणा देणाऱ्या अशा सन्मान सोहळ्यामुळे महाराष्ट्रातील अनेक नवउद्यमी, सामाजिक कार्यकर्ते आणि तरुणाईला नवीन दिशा मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments