Tuesday, October 14, 2025
घरमहाराष्ट्रसरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ वांद्रे येथे १५ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी...

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ वांद्रे येथे १५ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार राष्ट्रीय चर्मकार संघाचा मोर्चा

मुंबई – देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात बूट फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे.गेली अनेक वर्षे सर्वोच न्यायालयात वकिली करणाऱ्या राकेश किशोर तिवारी या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वकिलाने हे कृत्य केलेले आहे. त्याच्या या देशद्रोही कृतीविरुध्द संपूर्ण देशामधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.या वकिलावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार संघाने केलेली आहे. या घटनेविरोधात जनतेच्या मनात प्रचंड असंतोष खदखदत आहे.या असंतोषाला मोकळी वाट करुन देणे आणि या घटनेचा व्यापक स्वरूपात निषेध करण्यासाठी हा मोर्चा वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हा कार्यालयावर येत्या बुधवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता धडकणार आहे.

या मोर्चा बाबत माहिती देताना राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने म्हणाले सरन्यायाधीशायांवर हल्ल्यांचा प्रयत्न करणाऱ्या अँड. राकेश किशोर तिवारी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे,तसेच बूट फेकीचा हल्ला झाला त्या दिवसाला ६ ऑक्टोबर या दिवसाला न्यायव्यवस्थेतील काळा दिवस म्हणून जाहीर करा.
जनमाणसामध्ये संविधानाप्रती जागृती व आदर असावा यासाठी देशातील प्रत्येक न्यायालयाच्या प्रांगणामध्ये हातामध्ये संविधान असलेला महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात यावा.देशातील प्रत्येक न्यायालयातील न्यायाधीशांना कडक सुरक्षा देण्यात यावी. देशाच्या व राज्यांच्या राजशिष्टाचारानुसार प्रत्येक न्यायाधीशाचा सन्मान ठेवण्यात यावा.या सह इतर महत्त्वाच्या मागण्यासाठी बुधवारी १६ ऑक्टोबर रोजी वांद्रे येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने यांच्या नेतृत्वाखालील प्रचंड मोर्चा काढण्यात येणार आहे,असे राष्ट्रीय चर्मकार संघाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष विलास गोरेगांवकर यांनी सांगितले.
राकेश किशोर तिवारी यांनी हल्ल्याचा केलेला प्रयत्न हा केवळ एका व्यक्तीवर नसून तो या देशाच्या संविधानावर व संविधान द्वारा स्थापित न्यायव्यवस्थेवर आहे. हे कृत्य अतिशय निंदनीय व अत्यंत कठोर शिक्षेस पात्र आहे. संबंधित घटनेमुळे देशातील सुरक्षा व्यवस्थेवर देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यासाठी सदर घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी यावी. अशी मागणी बाबुराव माने यांनी केली आहे
ज्या देशामध्ये सरन्यायाधीश सुरक्षित नाही त्या देशांमध्ये आम माणसाचे काय हाल असतील असे देखील बाबुराव माने यांनी पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे. देशामध्ये सरकारच्या पक्षपाती धोरणामुळे अराजकता निर्माण होत असल्यास सर्वसामान्य जागरूक माणसाने आपले अधिकार आणि संविधानाच्या संरक्षणासाठी कायदेशीर मार्गाने रस्त्यावर उतरावे लागेल.

सरन्यायाधीशायांच्या मुंबई दौऱ्यात राजशिष्टाचाराचे उल्लंघन

गवई हे सरन्यायाधीश झाल्यावर प्रथमच महाराष्ट्र दौर्‍यावर मे महिन्यात आले.या दौऱ्यात मुंबईत त्यांचा सत्कार होता.पण तेंव्हा कोणीही सरकारी अधिकारी उपस्थित नव्हते.हा एक प्रकारे राजशिष्टाचाराचे उल्लंघन होते.याप्रकरणी राज्य शासनाने कारवाई केली असती तर अशा बूट फेकीला लगाम बसला असता काय असा सवाल माने यांनी केला आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments