ताज्या बातम्या

माहिती अधिकार नागरी समूहाचे तिसरे अधिवेशन पुण्यात संपन्न उत्कृष्ट माहिती अधिकार कार्यकर्ता पुरस्कार अहमदनगरचे दीपक पाचुते यांना

पुणे (प्रताप भणगे) : ज्ञानमाता सेवाभावी संस्था संचलित माहिती अधिकार नागरी समूहाचे तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन पुण्यातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक हॉल, येरवडा येथे उत्साहात पार पडले.

या अधिवेशनास प्रमुख पाहुणे म्हणून सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर आणि सनई छत्रपती शासनाचे अध्यक्ष प्रा. नामदेवराव जाधव उपस्थित होते. अधिवेशनाचे वातावरण उत्साहवर्धक आणि खेडीमेडीच्या रंगात पार पडले. राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी माहिती अधिकार क्षेत्रातील अनुभव, अडचणी आणि यशोगाथा शेअर केल्या.

कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध भागांत प्रभावीपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला. त्यात अहमदनगर जिल्ह्याचे दीपक पाचुते यांना यावर्षीचा “उत्कृष्ट माहिती अधिकार कार्यकर्ता पुरस्कार” ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी विवेक वेलणकर व प्रा. नामदेवराव जाधव यांनी शासकीय कार्यालयांमधील पारदर्शकतेचे महत्त्व आणि माहिती अधिकार कायद्याचा प्रभावी वापर याबाबत मौलिक विचार मांडले.

संस्थेचे संस्थापक आभार आढाव सर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “प्रजा हीच राजा आहे; मात्र राजा झोपलेला आहे, त्याला जागे करणे अत्यावश्यक आहे. नागरिक जागरूक झाले तरच महाराष्ट्र आणि भारत भ्रष्टाचारमुक्त होऊ शकतो.

कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top