काळगाव : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 138 वी जयंती विद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली.
दिनांक 22 सप्टेंबर रोजी कर्मवीर आण्णांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक बैलगाडी मधून काढण्यात आली. बैलगाडी आकर्षक पद्धतीने सजवण्यात आलेली होती मिरवणुकीमध्ये लेझीम पथक झांज पथक सहभागी झाले होते. वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. कर्मवीर आण्णांचा जयजयकार व रयत शिक्षण संस्थेच्या जयघोषाने काळगाव परिसर दुमदुमून गेला.
सोमवार दिनांक 29/09/2025
रोजी सकाळी ठीक 11.00 वा. विद्यालयाच्या प्रांगणात सभेच्या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मा. श्री. सुरेश काळे, उपअधीक्षक मध्य विभाग, रयत शिक्षण संस्था, सातारा आणि प्रमुख पाहुणे मा. श्री.के. के. घाटगे माजी सहसचिव रयत शिक्षण संस्था सातारा, हे लाभले होते. माजी मुख्याध्यापक मा. श्री. ए.बी.खराडे, दि रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक माननीय श्री. विक्रमसिंह देसाई, माजी मुख्याध्यापक श्री साळुंखे डी. ए. हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील व सौ.लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून झाली. विद्यालयाच्या गीत मंचच्या विद्यार्थिनीनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. प्रास्ताविकात विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री.ए.पी. कांबळे सर यांनी शाळेचा इतिहास व उज्वल यशाची परंपरा विषद केली. गुरुकुल प्रमुख सौ. यादव एस. एस. यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. विद्यालयाच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. विद्यालयाची इ. 12 वी ची विद्यार्थीनी कु. कुलसूम मुल्ला हिने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीम माने एस. एम. यांनी कर्मवीरांचे बालपण व कार्य याविषयी सखोल माहिती सांगितली. विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ.जाधव एम.एस. यांनी शैक्षणिक वर्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना विविध पारितोषिकांचे वितरण केले.
31 ऑक्टोबर 2025 रोजी विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री. ए. पी. कांबळे सर सेवानिवृत्त होत आहेत या कार्यक्रमाचे औचित्य साधून सरांनी विद्यालयास रु. 25000/- देणगी दिली. त्याचा स्वीकार कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी केला.
माननीय श्री. व्ही. टी. देसाई सर यांनी कर्मवीर आण्णा व संस्थेविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना माननीय श्री. के. के. घाटगे साहेब म्हणाले नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी सक्षम बनला पाहिजे. कर्मवीर आण्णांनी राबविलेली कमवा आणि शिका योजना, बदलते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. सुरेश काळे यांनी रयत शिक्षण संस्थेची शाखा काळगाव मध्ये सुरू झाल्याने काळगाव सारख्या डोंगर कपारीतील मुले शिकून उच्च पदस्थ झाली. विद्यालयाच्या भौतिक सुविधा वृद्धिंगत करण्यासाठी व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.साबळे एम. जी. श्री. कांबळे टी.व्ही, श्री. थोरात एम. एस. श्री. पाटील ए.एस. श्रीम. पवार एस. एस. कु. साबळे पी.एस.श्रीम. भिंगारदिवे एस. आर. कु. सुतार एस. बी. श्री. अमोल चव्हाण सर या सर्वांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमासाठी स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य मा.श्री. शिवाजी पवार मा. श्री. आर. बी. पाटील, मा. श्री. आर. सी. येळवे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. श्री. सुनील तेटमे, श्री. मुबारक संदे, श्री. राजेंद्र पाटील, श्री वसंत देसाई, माता पालक संघाच्या सदस्या सौ.रुपाली पवार, सखी सावित्री समितीच्या सदस्या, सौ. कोमल जगताप शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे सदस्य श्री. अनिल नाईक पालक शिक्षक संघाचे सदस्य श्री संपतराव लोटळे, श्री.संपत नलवडे, श्री.सुरेश पुजारी, तसेच काळगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी उपस्थित होते.
मा. श्री.ए.पी. कांबळे सर यांच्याकडून उपस्थित सर्व निमंत्रित मान्यवर तसेच विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना स्नेहभोजनाचे
आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.मुळे एम.के. यांनी केले व आभार श्री दीक्षित एस. व्ही यांनी मांडले व कार्यक्रम संपन्न झाला.
रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, काळगाव विद्यालयात कर्मवीर आण्णांची 138 वी जयंती उत्साहात संपन्न
RELATED ARTICLES