कराड :
घोगाव येथील गुरुकुल विद्यालय घोगाव येथे नूतन विद्यार्थी वसतिगृह “रायगड भवन” चे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. कराड अर्बन बँकेचे कार्यकारी संचालक श्री दिलीप गुरव आणि माजी उपजिल्हाधिकारी पुणे,श्री. अशोक पाटील यांच्या हस्ते या वसतिगृह उद्घाटन पार पडले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री सुधीर पाटील,सचिव स्वप्नाली पाटील यांच्यासह उदयराज पाटील, श्रीमती सविता लातूर विजय पाटील,अजित गायकवाड,तुषार खराडे आदी मान्यवर उपस्थित होते.या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उत्तम सोयी सुविधा उपलब्ध होणार असून त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल असे मत अशोक पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना
शाळा व शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात किती महत्वाचे आहे यावर मार्मिक भाष्य करून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. दिलीप गुरव यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संदीप सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.शिद मॅडम यांनी केले तर श्री कोकरे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.हे वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श निवासस्थान ठरेल आणि त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस मदत करेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.