मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना पुरस्कृत शेलारमामा फाउंडेशन व सुशांत शेलार यांच्या संकल्पनेतून “आपला दांडिया” या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.२८, २९, ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर या कालावधीत, सायंकाळी ७ वाजल्यापासून तालचेकर वाडी शाळेजवळ, लोअर परळ उड्डाणपुलाखाली रंगणाऱ्या या दांडियामध्ये पहिल्याच दिवशी म्हणजे २८ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.कार्यक्रमाचे आकर्षण ठरले ते झी मराठी वरील लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मी निवास’ येथील कलाकारांची उपस्थिती. हर्षदा खानविलकर, तुषार दळवी, अक्षया देवधर, मेघन जाधव, तन्वी कोलते, कल्याणी जाधव, कुणाल शुक्ल यांसारख्या कलाकारांनी मंचावर येऊन उपस्थित प्रेक्षकांसोबत दांडिया खेळत, नवरात्रीचा आनंद द्विगुणीत केला. याशिवाय सुप्रसिद्ध गायक मनीष राजगीरे व अभिनेता हार्दिक जोशी यांनीही आपली हजेरी लावत वातावरण अधिकच रंगतदार केले.सुसज्ज वाद्यवृंद, आकर्षक संगीत, चकाकते दिवे, रंगीबेरंगी पोशाख आणि पारंपरिक ढंगातील नृत्यांनी सजलेला “आपला दांडिया” एक सांस्कृतिक पर्वणी ठरतो आहे.या कार्यक्रमास उद्याही अनेक मराठी कलाकार, गायक व रसिकांची उपस्थिती अपेक्षित असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक सुशांत शेलार यांनी केले आहे.
⸻
आपला दांडिया – मराठी सांस्कृतिकतेचा उत्सव, आपल्या उपस्थितीची वाट पाहतोय!





